कविराज विजय यशवंत सातपुते
*उन्हाळी सुट्टी*
(प्रस्तुत है कविराज विजय यशवंत सातपुते जी द्वारा रचित e-abhivyakti में प्रथम बाल गीत *उन्हाळी सुट्टी* प्रस्तुत है। मुझे पूर्ण विश्वास है कि आपको भी अपनी गर्मियों की छुट्टी याद आ ही जाएगी। इस बालगीत के लिए हम कविराज विजय यशवंत सातपुते जी के हृदय से आभारी हैं।)
झाली परीक्षा आता आहे अभ्यासाशी कट्टी .
हवे तसे रे वागू आता सुरू उन्हाळी सुट्टी.
गावी जाऊ मामाच्या नी खेळू मजेचे खेळ
आट्यापाट्या, सूरपारंब्या ,जमेल अमुची गट्टी.
उशीरा उठणे, आणि पोहणे,पाणी कापत जाणे .
दंगा मस्ती, हाणामारी, अन् क्षणाक्षणाला कट्टी .
आमराईचा आंबा म्हणजे राजेशाही खाणे
कच्ची कैरी भेळेमधली, पावभाजीला सुट्टी.
पन्हे कैरीचे, कोकम सरबत, कधी ताक नी लस्सी
कोकणचा तो रसाळ मेवा, कोल्ड्रिंकशी कट्टी.
आला उन्हाळा, घरी बसा रे , दटावती सारे
बैठे खेळ ते बुद्धीबळाचे ,देऊ गेमला सुट्टी.
अशी ऊन्हाळी सुट्टी आमच्या होती बालपणात
सोडून गेले शाळू सोबती, आता नाही बट्टी. . . !
© विजय यशवंत सातपुते, यशश्री पुणे.
मोबाईल 9371319798