सुश्री प्रभा सोनवणे
कवितेच्या प्रदेशात # 216
☆ माझी लेक ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆
☆
माझ्या लेकीचे दिसणे
आणि निखळ हसणे
कुणी दृष्ट नका लावू
कुशीतले हे चांदणे !
*
आले आभाळच हाती
मिळविले चंद्र तारे
कुस माझी उजवली
सुख मिळाले की सारे !
*
नीट वाढवीन तिला
जपणूक ,निगराणी
झुला हाताचा करून
माझी सांगेन कहाणी!
*
माझ्या मनीचे गुपीत
फक्त तिलाच कळेल
आणि बाईच्या जातीला
नवे क्षितिज मिळेल!
*
नसे अंधाराची भीती
लेक माझी तेजस्विनी
घडविन तिला मी गं
तळपती सौदामिनी!
☆
© प्रभा सोनवणे
२४ जानेवारी २०२४
संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011
मोबाईल-९२७०७२९५०३, email- [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈