सुश्री प्रभा सोनवणे

 

? कवितेच्या प्रदेशात # 252 ?

☆ मुक्त मनोमनी झाले ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

किती मांडले हे

जिण्याचे पसारे

नसे मुक्तता यातूनी…

हवे जे मिळेना,

नको ते पुढे ठाकले  !

*

नियती— नशीब

प्रारब्ध– प्राक्तन

किती शब्द शोधीत,

स्वीकारून सारे—

आयुष्य हे सोसले !

*

जगरहाटी चालूच आहे ,

जरासे मनासारखे

वागले…

गुंतले जरी या,

पसार्‍यात साऱ्या,

 मुक्त मनोमनी जाहले !

© प्रभा सोनवणे

७ डिसेंबर २०२४

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार

पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- sonawane.prabha@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments