सुश्री प्रभा सोनवणे
कवितेच्या प्रदेशात # 253
☆ देशातील मुलींची पहिली शाळा… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆
☆
किती पिढ्या सोसत राहिली,
बाई अनंत अत्याचार…
अचानक,
महात्मा फुलेंना झाला साक्षात्कार!
“ढोल, ढोर और नारी,
सब ताडन के अधिकारी”
असेच होते वास्तव जगाचे !
ज्योतिबांना लागला ,
स्त्री शिक्षणाचा ध्यास,
घेतला स्वपत्नीचा अभ्यास!
शिक्षिका बनविले ,
सावित्रीबाईंना —
सोसला प्रस्थापितांचा त्रास,
परी स्त्री शिक्षणाची आस,
उभयतांमधे कमालीचा,
आत्मविश्वास!
देशातील पहिली मुलींची शाळा,
काढली भिडे वाड्यात,
अन् झाली स्त्री शिक्षणाची,
सुरुवात!!
☆
© प्रभा सोनवणे
१४ नोव्हेंबर २०२४
संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार
पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011
मोबाईल-९२७०७२९५०३, email- [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈