सुश्री प्रभा सोनवणे
कवितेच्या प्रदेशात # 269
☆ खुशी… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆
☆
एक हिंदी कवयित्रीनं विचारलं माझ्यासमोरच,
दुसऱ्या हिंदी कवयित्रीला—
“ये प्रभा सोन – वणेजी है ना,
महाराष्ट्र इकाई की अध्यक्ष?
बहुत अच्छा चला रही है,
महाराष्ट्र इकाई!”
खूप छान वाटलं होतं,
पण तेव्हा मला आठवली,
माझ्याबरोबर काम करणारी,
वेदस्मृती- महाराष्ट्र इकाई मंत्री!
खूप प्रगल्भ, सुजाण कवयित्री,
तिच्यामुळेच हताळलेली,
काही हिंदी वृत्ते,
आपल्या यशात नेहमीच,
सामिल असतात,
आपले आप्तस्वकीय,
कुठल्याही कामाचा असू नये गर्व, दंभ,
एकटीनेच एव्हरेस्ट जिंकल्यासारखा!
“खुशी बाँटनेसे दुगुनी होती है”
हे भान असलेल्या,
माझ्यातल्या मी वर मीच,
खुश असते मी नेहमीच!
☆
© प्रभा सोनवणे
संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार
पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011
मोबाईल-९२७०७२९५०३, email- [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈