(सुश्री प्रभा सोनवणे जी हमारी पीढ़ी की एक वरिष्ठ मराठी साहित्यकार हैं । प्रस्तुत है e-abhivyakti के विशेष अनुरोध पर लिखी सुश्री प्रभा जी की एक बेहतरीन मराठी गजल।)
मोरपंखी स्वप्न माझे फक्त विरले आजवर
हेच माझ्या जीवनाचे सार ठरले आजवर
ना तुला जाणीव झाली सोसले मी काय ते
कोण जाणे येथ कैसे दिवस सरले आजवर
दोष ना देते तुला वा दोष नाही प्राक्तना
जे मिळाले त्यात आहे मी बहरले आजवर
मी फुलाना काय सांगू जखम करता मज तुम्ही
वार त्यांचे काळजावर घेत फिरले आजवर
जे नको होते मुळी ते ही करावे लागले
तू मला प्रत्येक वेळी गृहित धरले आजवर
कोवळे वय येत नाही फिरुन माघारी कधी
मी कुठे आई तुझे ते बोट स्मरले आजवर
लोक किल्ले बांधती वाळूत, बांधो बापडे
सागरा मध्ये स्वतःच्या मस्त तरले आजवर
© प्रभा सोनवणे,
“सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पुणे – ४११०११
मोबाईल-9270729503
अपूर्ततेविण कधी न स्फुरती
शब्द मना जे स्पंदन करती
धन्यवाद सुभाषजी
“सागरावर स्वतः च्या तरले…”.खूप छान!
धन्यवाद अरूणजी
सागरा मध्ये स्वतःच्या मस्त तरले आजवर…..
वाह… खूप छान
धन्यवाद अरूणजी
धन्यवाद सुजाता जी
धन्यवाद सुजाताजी