सुश्री विजया देव
☆ व्रुत्त आनंदकंद ☆ –
(वरिष्ठ मराठी साहित्यकार सुश्री विजया देव जी की एक भावप्रवण व्रुत्तबध्द मराठी कविता।)
माझ्या घरी उन्हाने मुक्काम ठोकलेला
शोधून राहिलो मी
माझ्याच सावलीला
बेभान धावलो मी
वेडात वागलो मी
त्या आरशात जेव्हा
मी पाहिले स्वताला
ऊगाच मीळते कां
ती सांत्वना कुणाची
रक्तात पाय न्हाले
कुरवाळले दुखाला
नाकारले सदा मी
ते प्रेम दांभि कांचे
समजावले कितीदा
माझ्याच या मनाला
देहावरी भरोसा
कां ठेव लाच तेव्हा
आत्म्यास कांविसरलो
दुरावलो सुखाला
झोळीत आज माझ्या
ओतून चंद्रतारे
ये साजणी तु आता
घेवून दीपमाला
© विजया देव, पुणे