श्री विक्रम मालन आप्पासो शिंदे
(आज प्रस्तुत है श्री विक्रम मालन आप्पासो शिंदे जी की एक भावप्रवण कविता “सत्तायदान (विडंबन)”।)
☆ सत्तायदान (विडंबन) ☆
आता निवडणुका व्हावें !
तिकीट मला आज्ञावें !
निवडूनी मज द्यावें !
मतदान हें !!
उदंड पैशाची रास पडो !
तया भ्रष्ट कर्मी गती वाढो !
काळे भांडे उघड ना पडो !
मैत्र लबाडांचे !!
विरोधकांचे तिमिर जावो !
एकटा स्वधर्म सत्ता पाहो !
जो नडेल तो तो उखडावों !
जीवजात !!
बरसत सकळ चंगळी !
पक्ष अनीष्ठांची मांदियाळी !
न डरता नेता मंडळी !
भेटती सदा !!
चला जाती धर्मांचे आरव !
चेतवा बंड फुकाचे गावं !
बोलते जे उलट !
पेटवायाचे !!
हिंसाचाराचे जे लांछन !
अखंड जे घडवून !
ते सर्वाही सदा दुर्जन !
आतंक होतू !!
किंबहूना सर्व पापी !
पूर्ण करोनी मानव लोकीं !
दानव वृत्ती ठेवूनी भूकी !
अखंडित !!
आणि प्रतिष्ठापजीवियें !
सर्व विशेष लोकी इयें !
भ्रष्टा – भ्रष्ट विजयें !
होवावे जी !!
येथ म्हणे श्री – नेता अपराधो !
हा होईल भय पसावो !
येणे वरे दुःख देवो !
दुःखिया झाला !!
( ज्ञानेश्वर माऊली (महाराष्ट्र में संत ज्ञानेश्वर महाराज जी के ग्रंथ ज्ञानेश्वरी को ‘माउली’ या माता भी कहा जाता है।) कृपया मला माफ करा…तुमच्या पसायदानाचं आता समाजात नेहमीचंच सत्तायदान झालंय… सर्व काही विरोधाभास आहे इथे…वैश्विक विचार नाही इथ ..उरला सत्तेचा खेळ आहे…!!! )
© कवी विक्रम मालन आप्पासो शिंदे
मु/पो-वेळू (पाणी फाउंडेशन), तालुका-कोरेगाव, जिल्हा-सातारा 415511
मोबाइल-7743884307 ईमेल – [email protected]
विडंबन “सत्तायदान” क्रमशः “अस्वस्थ” या काव्यसंग्रहातून…!
आवडल्यास प्रतिक्रिया जरूर द्या..सदैव आपल्या सेवेसी 7743884307