सौ. गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ …आणि आनंदाने जगा… – लेखक: अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर

अमेरिकेत घरी स्वयंपाक करणे बंद झाल्यावर काय झाले…?

1980 च्या दशकातील प्रख्यात अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांनी अमेरिकन लोकांना चेतावणी दिली.

स्वयंपाकघर खाजगी कंपन्यांच्या ताब्यात देण्यात आले असून, सरकारनेही वृद्ध आणि लहान मुलांची काळजी घेतल्यास कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि त्याची प्रासंगिकता नष्ट होईल… पण तो सल्ला फार कमी लोकांनी ऐकला.

घरी स्वयंपाक करणे बंद झाले आणि बाहेर ऑर्डर करण्याच्या सवयीने बरीचशी अमेरिकन कुटुंबव्यवस्था नष्ट झाली… !

घरात स्वयंपाक करणे म्हणजे कुटुंबाला एकत्र ठेवणे, आपुलकीने जोडणे. पाककृती ही केवळ कला नाही… ! तर ते एक कौटुंबिक संस्कृती आणि समाधानाचे केंद्र आहे…!

घरात जर स्वयंपाकघर नसेल आणि फक्त बेडरूम असेल तर ते कुटुंब नाही त्याला वसतिगृह किंवा हॉटेलच म्हणावे लागेल !

स्वयंपाकघर बंद करून एकच बेडरूम पुरेशी आहे असे वाटणाऱ्या अमेरिकन कुटुंबांचे काय झाले… ?

1971 मध्ये, 71 टक्के यूएस कुटुंबांमध्ये मुलांसह जोडीदार होते, परंतु आज, पन्नास वर्षांनंतर, ही संख्या 20 टक्क्यांपर्यंत घसरली आहे, कुटुंबे आता नर्सिंग होममध्ये राहतात.

अमेरिकेत 15% स्त्रीया एकट्या राहतात.

12% पुरुष कुटुंबात एकटेच राहतात.

19% घरांची मालकी फक्त वडिलांची किंवा आईची आहे.

केवळ 6% कुटुंबात पुरुष आणि महिला एकत्र आहेत.

अलिकडच्या काळात जन्माला आलेल्या बाळांपैकी 41% शिशु अविवाहित स्त्रियांपासून जन्माला आली आहेत त्यापैकी निम्म्या अपरिपक्व मुली शाळेत जाणाऱ्या आहेत, ही अतिशय गंभीर वस्तुस्थिती आहे…

41% ही खूप मोठी आकडेवारी आहे. म्हणजेच अमेरिकेत कौमार्य असे काही उरले नाही…

परिणामी, अमेरिकेत सुमारे 50 टक्के पहिले विवाह घटस्फोटात,

 67 टक्के द्वितीय विवाह आणि 

74 टक्के तृतीय विवाह समस्याग्रस्त आहेत.

फक्त बेडरूम म्हणजे कुटुंब नाही.

 स्वयंपाकघर नसेल तर….

 युनायटेड स्टेट्स हे तुटलेल्या लग्नाचे उदाहरण आहे.

 आपल्या देशातील नागरिकांना कायमस्वरूपी खाद्यपदार्थ दुकानातून विकत घेण्याची सवय लागली तर इथली कुटुंबव्यवस्था देखील अमेरिकेप्रमाणे नष्ट होईल कुटुंबे उद्ध्वस्त झाली की मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य बिघडते.

बाहेरील अन्नपदार्थ खाल्ल्याने शरीर लठ्ठ आणि बेढब बनते मग लहान-मोठे आजार, इन्फेक्शन आदी समस्या उद्भवतात व खर्च देखील वाढतो…

घरात स्वयंपाक करणे आणि घरातील सदस्यांसोबत बसून खाणे हे कुटुंब व्यवस्थेसाठी हिताचे आहे!

अर्थव्यवस्थेसाठी शारीरिक आरोग्य आणि मानसिक आरोग्य देखील आवश्यक आहे.

म्हणूनच पुर्वजांनी आम्हाला बाहेरचे न खाण्याचा सल्ला दिला पण……………

आज आपण आपल्या कुटुंबासोबत रेस्टॉरंटमध्ये जेवतो… स्विगी, झोमॅटो, उबेर यांसारख्या फूड सर्व्हिस कंपन्यांकडून दिवसा किंवा रात्री कोणत्याही वेळी शरीराला लहान-मोठे आजार होऊ देणारे अन्न खाण्यासाठी ऑनलाइन ऑर्डर करतो…

अगदी उच्चशिक्षित, मध्यमवर्गीय लोकांमध्येही आता ही फॅशन झाली आहे.

भविष्यात ही सवय समाजासाठी मोठी आपत्ती ठरणार आहे…

आपण काय खावे हे ऑनलाइन कंपन्या ठरवतात… जेणेकरून डॉक्टर आणि औषध कंपन्यांची कमाई वाढेल…

 आपले पूर्वज प्रवासात अथवा तीर्थयात्रेला जाण्यापूर्वी घरात बनवलेले अन्नपदार्थ सोबत घेऊन जात असत.

 म्हणूनच घरी स्वयंपाक करा,

 आणि…

 आनंदाने जगा…!

(सोशल मिडीयाचा वापर लोकांना प्रभावित करण्यासाठी नाही तर लोकांच्या आचरणात आणि विचारात परिवर्तन करण्यासाठी करा.)

लेखक : अज्ञात 

संग्राहिका : सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
5 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments