श्री सुहास रघुनाथ पंडित
वाचताना वेचलेले
☆ वाकळ…श्री.दि.इनामदार ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆
पीठ शेल्याला लागले, झाला राऊळी गोंधळ
कुण्या घरचे दळण, आला दळुन विठ्ठल
पीठ चाखले एकाने, म्हणे आहे ही साखर
पीठ हुंगले दुज्याने, म्हणे सुगंधी कापुर
कुणी शेला झटकला ,पीठ उडुन जाईना
बुचकळला पाण्यात, पीठ धुऊन जाईना
झाली सचिंत पंढरी, वाढे राऊळी वर्दळ
ठिगळाच्या पांघरुणा, शेला म्हणती सकळ
फक्त जनीस दिसते, होती तिची ती वाकळ
विठ्ठलप्रेमे भरुन आले, जनी रडे घळघळ…
संत जनाबाईला दळण—कांडणात मदत करणारा पंढरपूरचा पांडुरंग, परत जाताना त्याचा शेला विसरतो व चुकून तिची वाकळ घेऊन जातो.
ह्या प्रसंगावर मराठवाड्यातील ज्येष्ठ कवी दिवंगत श्री. दि. इनामदार यांनी लिहिलेली “वाकळ” नावाची एक सुंदर कविता .
© सुहास रघुनाथ पंडित
सांगली (महाराष्ट्र)
मो – 9421225491
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈