सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी
वाचताना वेचलेले
☆ गीतांजली भावार्थ …भाग 16 ☆ प्रस्तुति – सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी ☆
[२३]
माझ्या मित्रा! या वादळी रात्री,
दूर देशाच्या प्रेमाच्या प्रवासात तू आहेस ना?
आकाश निराश होऊन उच्छ्वास टाकते आहे
आज रात्रभर मला झोप नाही,
पुन्हा पुन्हा मी दार उघडतो,
अंधाराकडे पाहतो
मला तर काहीच दिसत नाही
कुठं बरं असेल तुझा रस्ता?
कुठल्या काळ्या नदीच्या
किनाऱ्यानं तू येत असशील?
भितीनं गोठवणाऱ्या रानाच्या आणि
भयचकित करणाऱ्या
कोणत्या दु:खमय दरीच्या
माझ्याकडं येणाऱ्या वाटेने तू येत असशील?
मराठी अनुवाद – गीतांजली (भावार्थ) – माधव नारायण कुलकर्णी
मूळ रचना– महाकवी मा. रवींद्रनाथ टागोर
प्रस्तुती– प्रेमा माधव कुलकर्णी
कोल्हापूर
7387678883
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈