वाचताना वेचलेले
☆ नातं… ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆
वेळेनुसार माणसं बदलतात..त्यांची priority बदलते.
नातं बदलतं.. नात्यातले संदर्भही बदलतात.
कधी वेड्यासारखी जीव लावणारी माणसं अचानक अनोळखीसारखी वागायला लागतात.
आपल्याला गृहीत धरल्या जातं.. टाळल्या जातं.
हेच त्या नात्यातलं सगळ्यात नाजूक वळण असतं.
इथेच नात्यातले अपघात होतात.
कधी कधी वाटतं
समोरच्याच्या आयुष्यातलं आपलं अस्तित्व आपल्याला ठरवता आलं असतं तर..?
पण दुर्दैव…असं नाही करता येत.
अशावेळी कोण चुकलं यापेक्षा काय चुकलं हे बघावं.
कारण एकमेकांच्या चुका शोधतांना उत्तर तर सापडतं पण माणसं हरवतात.
आपण फक्त अवघड झालेलं सोपं करण्याचा प्रयत्न करावा.
एकदा…दोनदा…..तीनदा…..
आपण आतून संपत नाही तोपर्यंत..करतच रहावा.
आणि या सगळ्याला
अपवाद असलेलं एखादं नातं असतंच …
जे शेवटपर्यन्त कधीच बदलत नाही.
आयुष्याच्या कुठल्यातरी वळणावर असं कुणीतरी येतं आपल्या आयुष्यात…
जे घट्ट मिठी मारून सांगतं…
आयुष्य खूप सुंदर आहे…आणखी थोडं जगुयात ना !
आपल्याला सोपं करतं,
आपल्याला समजून घेतं.
आपण कायम खास असतो त्यांच्यासाठी.
बस तेच मनापासून जपावं
इतकंच असतं आपल्या हातात ——
संग्राहिका : सुश्री मीनल केळकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈