सुश्री मंजुषा सुनीत मुळे
वाचताना वेचलेले
☆ गृहिणीची कमाई… सुश्री सुमन नासागवकर ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे☆
एक दिवस एक उच्चशिक्षित नवरा आपल्या बायकोला भाषण देत होता, “पैसे कमव आणि मग तुला कळेल की पैसा कसा खर्च करावा.मी तुला आज एक दिवस देतो. घराच्या बाहेर पड आणि बघ किती स्पर्धा चालू आहे. काहीतरी प्रयत्न कर काम शोधण्यासाठी”…..आणि तीही एक शिक्षित बायको, एक आई आणि एक सून होती.
ती बाहेर निघाली आणि दिवसभर फिरत राहिली.. इकडे जा, तिकडे जा आणि मग तिच्या लक्षात आले, ‘अरे हो. खरंच की. आपण ही पैसा कमावू शकतो. मग का आपण शिक्षित असूनही इतके दिवस घालवले?’
घरी आली. नेहमीप्रमाणे सासू सासऱ्यांना वेळेवर नाश्ता, जेवण, मुलांचा डबा, वेळेवर शाळेत पाठवणे , नवऱ्याला डबा, त्याचा आवडीचा नाश्ता, जेवण बनवले आणि खोलीत गेली.
नवरा आला आणि म्हणाला, ” काय मग? कळाले असेल आज, मार्केटमध्ये किती स्पर्धा चालू आहे आणि तू फक्त घरात बसलीयस.”
तिने काही न बोलता त्याला एक लिस्ट दिली. त्यात तिने घरात घालवलेली अनेक व्यर्थ वर्षे व मार्केट मध्ये त्या कामांसाठी मोजावी लागणारी किंमत यांची यादी होती.
तिने सुरुवात त्याच्याच आई-वडिलांपासून केली होती. ज्यावेळेस त्याने वाचायला सुरुवात केली, त्याला एकदम घाम फुटला.
- सासू-सासऱ्यांची सेवा, ज्याला मार्केटमध्ये केअरटेकर म्हणतात. पगार – ₹20,000
- मुलांचा सांभाळ आणि त्यांना संस्कार लावणे ज्याला मार्केटमध्ये बेबीसीटिंग म्हणतात. पगार ₹15000
- घरातील पसारा जागेवर ठेवणे आणि घर काम करणे ज्याला मार्केटमध्ये मेड म्हणतात.पगार ₹5000
- आणि त्याच बरोबर सर्वांची आवडनिवड बघून सकाळ संध्याकाळ केलेला स्वयंपाक,ज्याला मार्केटमध्ये कूक म्हणतात.पगार ₹10000
- घरात आलेल्या पाहुण्यांचा पाहुणचार ज्याला मार्केटमध्ये पाहुण्यांचे आदरातिथ्य करणारा होस्ट म्हणतात. पगार ₹5000 अशा प्रकारे तिने नवऱ्याकडे महिन्याच्या ₹55000 पगाराची मागणी केलेली होती.
मग त्याच्या डोळ्यातून हळू हळू अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. ज्या व्यक्तीने स्वतःचा कणभरही विचार न करता माझ्या घराला वेळ दिला, तिची किंमत मार्केटमध्ये शोधूनही न मिळणारी होती.
तात्पर्य एवढेच की ज्यावेळेस एक शिक्षित स्त्री घरात बसते त्यावेळेस ती खूप विचार करुन सगळं काही करत असते. एक आईच मुलांवर चांगले संस्कार करू शकते. त्यांच्याकडे चांगले लक्ष देऊ शकते.
गृहीत धरलेली प्रत्येक बायको ही एक जबाबदार सून, आई आणि बायको ह्यांचं कर्तव्य निस्वार्थपणे निभावत असते. त्यांना कमी लेखू नका.
लेखिका: सुमन नासागवकर, अमळनेर.
संग्राहिका :मंजुषा सुनीत मुळे.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈