सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी
वाचताना वेचलेले
☆ गीतांजली भावार्थ …भाग 49 ☆ प्रस्तुति – सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी ☆
९०.
यमराज जेव्हा तुमचे दार ठोठवेल तेव्हा
तुम्ही काय द्याल?
मी त्याला रिक्त हस्ते जाऊ देणार नाही.
माझ्या त्या पाहुण्याकडे माझ्या
आयुष्याचा पूर्ण कुंभ ठेवीन.
माझ्या शिशिरातल्या दिवसांची भेट त्याला देईन,
वसंत ऋतूतील मधुर फळे देईन,
माझ्या उद्योगशील दिवसांत गोळा केलेले
धान्याचे कण त्याला अर्पण करेन.
जेव्हा माझ्या जीवनाच्या शेवटच्या दिवशी
यमदूत माझ्या दारावर ठोठावेल.
९१.
हे मृत्यो, तू माझ्या जीविताची
अखेरची परिपूर्णता आहेस!
ये, आणि माझ्याशी हितगुज कर!
मी तुझ्या वाटेकडे दिवसांमागून दिवस
डोळे लावले आहेत.
जीवनातला आनंद व दु:ख मी तुझ्यास्तव
सोसली आहेत.
मी जसा आहे, माझ्याकडे जे आहे,
माझ्या आज्ञा,माझे प्रेम हे सर्व
एकांताच्या गहराईत तुझ्याकडेच वाहात होतं.
तुझा एकच अखेरचा दृष्टीक्षेप पडावा
आणि हे माझं जीवन कायमचं तुझं व्हावं!
वरासाठी फुलं ओवून त्यांचा हार सिध्द आहे.
विवाहानंतर वधू आपलं घर सोडेल,
तिच्या परमेश्वराला रात्रीच्या
नीरव शांततेत ती एकटीच भेटेल.
मराठी अनुवाद – गीतांजली (भावार्थ) – माधव नारायण कुलकर्णी
मूळ रचना– महाकवी मा. रवींद्रनाथ टागोर
प्रस्तुती– प्रेमा माधव कुलकर्णी
कोल्हापूर
7387678883
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈