श्री अमोल अनंत केळकर
वाचताना वेचलेले
☆ ते आता दिसणार नाहीत … ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆
२६ फेब्रुवारी १९६६ या दिवशी स्वा. वि. दा. सावरकरांचे निर्वाण झाले. लोककवी मनमोहन यांनी या दुःखद प्रसंगी आपल्या भावना पुढील काव्यातून व्यक्त केल्या…
ते आता दिसणार नाहीत
की जे निशाणातच नव्हे, प्राणातही भगवे होते !
ते आता स्पंदणार नाहीत
की जे वेरुळचे शिल्प अंदमानात घडवीत होते !
ते आता बोलणार नाहीत
की जे सत्तावन्न नंतरचे खरे ‘अठ्ठावन्न’ होते !
ते आता हसणार नाहीत
की जे अमावस्येची प्रसन्न पुनव करीत होते !
संग्राहक : अमोल केळकर
बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९
poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈