वाचताना वेचलेले
स्त्री शिवाय माणूस अपूर्णच!… ☆ प्रस्तुती – सौ. प्रज्ञा गाडेकर
बघा ना..
शिक्षण घेत असताना ‘विद्या ‘
नोकरी उद्योग करताना ‘लक्ष्मी ‘
अंतसमयी ‘ शांती’!
सकाळ सुरु होते तेव्हा ‘उषा ‘
दिवस संपताना ‘ संध्या ‘!
झोपी जाताना ‘ निशा ‘
झोप लागली तर ‘सपना’!
मंत्रोच्चार करताना ‘गायत्री’
ग्रंथ वाचन करताना ‘गीता ‘!
मंदिरात ‘ दर्शना ‘, ‘वंदना ‘, ‘ पूजा’,’आरती’,अर्चना’
शिवाय ‘ श्रद्धा ‘ तर हवीच!
वृद्धपणी ‘ करूणा ‘
पण ‘ ममता’सह बरं
आणि राग आलाच तर ‘क्षमा ‘!
जीवन उजळविण्यासाठी ‘उज्ज्वला’
आनंद मिळविण्यासाठी ‘कविता’
अाणि
कविता करण्यासाठी ‘प्रतिभा’!
आणि सर्वात महत्वाचं
प्रश्न सोडवायचा असेल तर,
सुचली पाहिजे ती ‘कल्पना’
अशा कविता रचण्यासाठी असावी लागते जवळ ती ‘प्रज्ञा’!
संग्राहिका :सौ. प्रज्ञा गाडेकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈