वाचताना वेचलेले
☆ आयुष्याचे गणित ☆ प्रस्तुति – कालिंदी नवाथे ☆
आयुष्याचे गणित चुकले असे कधीच म्हणू नये.
आयुष्याचे गणित कधीच चुकत नसते, चुकतो तो चिन्हांचा वापर.
बेरीज,वजाबाकी, गुणाकार,भागाकार ही चिन्हं योग्य पद्धतीने वापरली की उत्तर मनासारखे येते.
आयुष्यात कुणाशी बेरीज करायची, कुणाला केंव्हा वजा करायचे, कधी कुणाशी गुणाकार करायचा आणि भागाकार करताना स्वतः व्यतिरिक्त किती लोकांना सोबत घ्यायचे हे समजले की उत्तर मना-जोगते येते.
आणि हो, मुख्य म्हणजे जवळचे नातेवाईक, मित्र, आप्तेष्ट यांचा हातचा एक समजू नये, त्यांना कंसात घ्यावे ! कंस सोडविण्याची हातोटी असली की गणित कधीच चुकत नाही.
प्रस्तुति – कालिंदी नवाथे
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈