वाचताना वेचलेले
☆ “पण…” ☆ प्रस्तुती – सौ. राधा पै. ☆
उंदीर दगडाचा असेल तर सर्व त्याची पूजा करतात. पण जर तो जिवंत असेल, तर आपल्याला त्याला मारल्या शिवाय चैन पडत नाही.
जर साप दगडाचा असेल, तर सर्व त्याची पूजा करतात,पण तो जिवंत असला तर त्याला जागीच ठार मारतात.
जर आई-वडील फोटोत असतील, तर प्रत्येकजण पूजा करतो,पण ते जिवंत असतील तर त्यांची किंमत समजत नाही.
फक्त हेच मला समजत नाही, की जीवनाबद्दल इतका द्वेष पण दगडांबद्दल इतकं प्रेम का आहे?
लोक विचार करतात, की मृत लोकांना खांदा देणं पुण्याचं काम आहे. आपण जिवंत माणसांना मदत करणं पुण्य समजलो, तर जीवन किती खुषहाल होईल.एकदा विचार करून बघा.
युधिष्ठराने एक सत्य सांगितलं होतं, “मरायचं सर्वांना आहे, परंतु मरावंसं कोणालाच वाटत नाही.
आजची परिस्थिती तर फार गंभीर आहे.
“अन्न” सर्वांनाच हवंय.पण “शेती” करावीशी कोणालाच वाटत नाही.
“पाणी” सर्वांनाच हवंय.पण “पाणी” वाचवावे, असे कोणालाच वाटत नाही.
“सावली” सर्वांनाच हवीय.पण “झाडे” लावावी व ती जगवावी असे कोणालाही वाटत नाही.
“सून” सर्वांनाच हवी आहे. पण “मुलगी” व्हावी असं कोणालाच वाटत नाही.
विचार करावा असे प्रश्न.पण विचार करावा असं कोणालाच वाटत नाही.
हा मेसेज सर्वांना आवडतो पण forward करावा असं कोणालाच वाटत नाही.
संग्राहिका :सौ. राधा पै
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈