सौ. विद्या पराडकर
वाचताना वेचलेले
☆ केव्हा उजळशील मम जीवन… कवयित्री : कु. रेणुका पराडकर ☆ प्रस्तुती – सौ. विद्या पराडकर ☆
विठोबाच्या दारी नाचे भक्तगण
दुमदुमली पंढरी गाणी गाती भक्त जन ….
रुप पाहुनी विठूरायाचे
हरपले देहभान
एकरुप झालो क्षणभरी
आले उर भरून …..
सगुणाकडून निर्गुणाकडे जाण्याची
लागली बघा ही ओढ
मध्ये उभा संसारसागर
पैलतीर आता तूच चढव …..
सावळे रूप गोजिरे सुंदर
भरजरी वस्त्रात लपले लावण्य
सवे उभी रुक्मिणी माउली
विनवी जोडोनी कर,कर माझ्यावर सावली …..
युगे अठ्ठावीस उभा
पुंडलिकासाठी देवा
भक्तांचा आहेस त्राता
तव चरणी केव्हा मिळेल विसावा? …..
कवयित्री : कु. रेणुका पराडकर, वर्ग ९ वा
संग्राहिका – सौ. विद्या पराडकर
वारजे पुणे.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈