सौ. सुनिता गद्रे
वाचताना वेचलेले
☆ वाटणी – उन्नती गाडगीळ ☆ प्रस्तुती – सौ. सुनिता गद्रे☆
मंदिराबाहेर ठेवलेली पायताणं भिजली. त्या बरोबर माझ्या अंतरातील मिजास… उफाळून जीभेवर आली. हळहळली.. चडफडली.. अन् पुटपुटली…
” छीsss आता माझे तलम, मलमली मोजे ओले होतील ना ! “
समोर.. फूटपाथवर.. मोडक्या.. विटक्या छत्रीखाली काटका.. फाटका.. तरूण व्रुत्तपत्र, पुस्तके विक्रेता.. पुढ्यात पुस्तके मांडून बसलेला..
क्षणात.. अवखळ वावटळ आली.. धारा नृत्य सुरू झाले. त्याची छत्री उडाली.. वर्षाराणीने पुस्तकांना अमृत पान दिले…
तो काटका.. फाटका असून.. न चडफडता.. हासत.. हासत.. फाटक्या कपड्यात पुस्तके बांधून झाडाखाली.. दुकान थाटून कुडकुडत उभा.. Great !!!
माझ्यातील मिजासीला.. गुर्मीला.. रडतराऊ व्रुत्तीला त्याच्या कृतीने टपली.. मारली !!!
? असाच एकदा.. आडदांड.. द्वाड .. वारा.. गवाक्षातून भसकन.. आत शिरला..
अन् क्षणार्धात… माझ्या मौल्यवान फुलदाणीचा चक्काचूर झाला..
मी.. हुंदकत..स्फुंदत काचा गोळा करत राहिले..
इवली.. चिऊताई टकारून माझ्या कडे बघत होती..
वाऱ्याने पडलेले तिचे घरटे.. त्यातीलच काडी काडी.. वेचून माझ्या गच्चीत.. आडोशाला घरटे बांधत होती..
फडफडत होती.. चिवचिवत होती..
धडपडत होती..
गिरकत.. मुरकत.. नेटानं.. पुन्हा पुन्हा.. बांधत होती..
टकमक माझ्या कडे बघून.. कसं जगायचं या शास्त्रातली Phd मिळवलेली चिऊताई मला सांगत होती…
” सतत सतत रडायचं नसत.. मनाला आवरून.. लढायचं असतं!!!”
धन्यवाद?
© उन्नती गाडगीळ ??
प्रस्तुती – सौ सुनीता गद्रे
माधवनगर सांगली, मो 960 47 25 805.
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈