वाचताना वेचलेले
☆ प्रश्नमंजुषा… अशीही… – अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆
प्रश्नमंजुषा… अशीही.
जराशी गम्मत ….. बघा तुम्हाला या प्रश्नांची उत्तरे मिळतात का?
१. पगाराला दोनने ‘गुणले’ तरी
‘भागत’ का नाही ?
२. लग्नाची ‘बेडी’ नक्की
कोणत्या गुन्ह्यासाठी ‘पडते’?
३. अक्कल ‘खाते’
कोणत्या बँकेत ‘उघडता’ येते?
४. ‘भाऊगर्दीत’
‘बहिणी’ नसतात का?
५. ‘बाबा’ गाडीत
‘लहान बाळांना’ का बसवतात?
६. ‘तळहातावरचा फोड’
किती मोठा होईपर्यंत ‘जपावा’?
७. मनाचे मांडे भाजायला
‘तवा’ का लागत नाही?
८. ‘दुग्धशर्करा योग’
‘मधुमेहींना’ वर्ज असतो का?
९. ‘आटपाट’ नगर
कोणत्या ‘जिल्ह्यात’ येते?
१०. ‘तिखट प्रतिक्रिया’
‘गोड’ मानून घेता येते का?
११. सतत ‘मान खाली’ घालायला लावणारा मित्र ‘मोबाईल’ असावा कां?
१२. ‘काहीही’ या पदार्थाची
‘रेसिपी’ मिळेल का?
१३. ‘चोरकप्पा’ नक्की
‘कोणासाठी’ असतो?
१४. ‘पालक’ ‘चुका’ दाखवून
मुलांना ‘माठ’ ठरवत असतात का?
१५. ‘पैशांचा पाऊस’ असेल
तर ‘छत्री’ उलटी धरावी का?
१६. ‘भिंतीला’ कान असतात
तर बाकीचे अवयव कुठे असतात?
(ज्यांना मराठीची मजा चाखता येते, त्यांच्यासाठी खास चेहरा खुलवणारी प्रश्नमंजुषा !)
लेखक : अज्ञात
प्रस्तुती : मीनल केळकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈