श्रीमती उज्ज्वला केळकर
वाचताना वेचलेले
☆ “जराशी शाब्दिक गंमत …” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆
☆
एक वेलांटी सरकली,
पिताकडून पतीकडे आली.
*
एक काना सरकला,
राम ची रमा झाली.
*
दोन काना जोडले,
शरद ची शारदा झाली.
*
एक मात्रा सरकली,
खेर ची खरे झाली.
*
एक अक्षर घटले,
आठवले ची आठले झाली.
*
एक अक्षर बदलले, अन्
मालू ची शालू झाली.
कर्वे ची बर्वे झाली.
अत्रे ची छत्रे झाली.
गानू ची भानू झाली.
कानडे ची रानडे झाली.
*
लग्नानंतर नांवच उलटे केले,
निलिमाची मालिनी झाली.
*
पदोन्नती झाली,
प्रधान ची राजे झाली.
राणे ची रावराणे झाली.
देसाई ची सरदेसाई झाली.
अष्टपुत्रे ची दशपुत्रे झाली.
*
झुरळाला भिणारी ती,
दैवयोगाने वाघमारे झाली.
*
लेकराला कुरवाळीत,
पुढे लेकुरवाळी झाली.
*
एक पिढी सरकली,
सुनेची सासू झाली !!
☆
लेखक : अज्ञात
संग्राहिका – सौ उज्ज्वला केळकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर