श्री सुनील देशपांडे
वाचताना वेचलेले
☆ “खरेदी…” लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनील देशपांडे ☆
“ तुमच्याकडे व्हॅक्युम क्लिनर आहे? ”
“ होय आहे !.” 👌
“कधी घेतलात?”
“झाली की १५-२० वर्षे.”
“व्वा, शेवटचा कधी बाहेर काढला वापरायला, आठवतो का?”
“झाली असतील ४-५ वर्षे. मुलीच्या लग्नाच्या वेळी काढला होता कि बहुतेक. !”
“आता कुठे असतो.”
“माळ्यावर असेल बहुदा?. हिला माहीत आहे.” 🤣
“मग नेहमी लागत नाही घर व्हॅक्युम करायला?”
“अहो, तो वापरणं फार कटकट आहे हो! मी तर हिला म्हणतो मी त्यापेक्षा झाडू मारीन व पुसून घेईन !.” 🤣
“पण मग घेतला कशाला?”
“अहो, एक वर्ष दिवाळीत हिला पाडव्याची ओवाळणी म्हणून घातला.”
“ म्हणजे तुम्ही आपण होऊन घातली ओवाळणी?”
“नाही. चार महिने आधी हिच्या बहिणीकडे घेतला होता. तिनेच तो सेल्समन आमच्याकडे पाठवला होता. मेव्हणी म्हणाली जाळ्या, जळमटे फार छान निघतात.” 🤦♀️♀️
“काय सांगता! मग नसतील जाळ्या, जळमटे तुमच्या घरात?”
“नाही हो !. कोणीही तो वापरायला नको म्हणतात. फार उस्तवार करावी लागते त्याची. सुरुवातीला मुलं भांडायची तो वापरायला. …मग उत्साह गेला. आता हीच मला म्हणते कधीतरी अहो, तो व्हॅक्युम क्लिनर लावून जाळ्या काढून द्या ना.” 🤣
“मी म्हणतो तिला तूच कर. तर म्हणते कशी… हे पुरुषांचं काम आहे. 🤦♂️”
“म्हणजे तुमच्याच अंगावर पडलं म्हणायचं.”
“मी नाही म्हणतो. त्यापेक्षा कुंचा घेतो आणि स्टूल घेऊन सोयीचं होतं.” 🤣
“मेव्हणी वापरते का?”
“नाही विचारलं कधी…. तिला काही विचारायची सोय नाही. …तिने काहीतरी नवीन घेतलेलं असतं आणि इकडे वाटतं आपल्याकडेही असावी ती वस्तू.”
“बरं… आता ते जाऊन द्यात. ही व्यायामाची सायकल दिसते आहे तुमच्याकडे.??? रोज करता की नाही व्यायाम?”
“नाही हो… टॉवेल वाळत घालतो तिच्यावर.”
“काढूयात का त्यावरचा टॉवेल?… अरेच्या! टॉवेलच्या ओलीमुळे गंजून गेली आहे हो सायकल…” 🤦♀️♂️ 😖
“अहो, मुलांसाठी आणली, पण १५ दिवसांनंतर वापरतील तर शपथ.?” 🤦♀️♂️♀️
“बरं आणली तेव्हा मुलगा किती वर्षांचा होता?”
“होता. ५-६ वर्षांचा. अहो, तेव्हा मीच वापरणार होतो. ही पण म्हणाली होती कि मी पण करीन व्यायाम 🏋🏼♂️🚴🏼♀️ पण राहूनच गेले. 😠
“आता वापरून बघू यात का?”
“अहो, तिची चेनपण तुटलीय. ती बसवलीच नाही.” 🤣
“बरं ते जाऊ द्यात. हे काय आहे?”
“रोनाॅल्डचा फूड प्रोसेसर.” 👌
“त्याचं काय करता?”
“यात कणिक मळली जाते, काकडी गाजराचे काप होतात. अजून काय काय बरंच होतं.” 👌
“अरे व्वा! वहिनींना त्रास कमी झाला असेल नाही.”
“ नाही अहो, आम्ही फक्त दाण्याचा कूट करतो त्यात. ही सुरुवातीला वापरायची. पण पुढे म्हणायला लागली तो धुवायचा कंटाळा येतो. त्यापेक्षा परातीत कणिक भिजवणे सुटसुटीत होते. थोडे हात दुखतात हिचे, पण मिक्सरचे भांडे आणि ब्लेड धुण्यापेक्षा बरे पडते.” 🤦♀️♀️
“मग घेताना लक्षात आले नाही?”
“अहो, तो सेल्समन हिच्या मैत्रिणीने पाठवला. तिने फार कौतुक केले. मग आम्हीपण घेतला.” 🤣
“ती मैत्रीण वापरते का?”
“काय आहे … हे बघा, ही म्हटली आणा. आपलं काम पैसे देणं आहे. 🤦♂️ 🤣 मी विचारत नाही का? कशाला?”
“बरं ते जाऊन द्या. तुमचा लग्नातला सूट आहे?”
“हो. आहे ना.” 👌 🎁 👌
“शेवटचा कधी घातलात?”
“आमच्या लग्नात.” 🤣
“म्हणजे किती वर्षे झाली.”
“दहा.पंधरा”
“मधे कधी घालून बघितलात?” 🤣
“पाच वर्षांपूर्वी मेव्हणीच्या लग्नात. पण बसला नाही.”
“म्हणजे तुमच्या लग्नाच्या दिवशी फक्त घातला.” 🤣
“नाही. नंतर एकदा कंपनीत सेमिनारला घातला. बसं इतकाच.” 🤦♀️♂️ 🤣
“काय किंमत होती?”
“त्या काळात दहा हजार असेल.”
“मग वहिनींचा लग्नातला शालू 🎁 👌 त्या अजून वापरतात?”
“नाही. तो शालू प्रत्येक वेळी घातला तर लोक काय म्हणतील? म्हणून प्रत्येक लग्नात नवी साडी घेते.”
“म्हणजे शालू एकदाच वापरला. होय ना?” 🤦♀️♀️
“ हो ! म्हणजे वापरला, पण ज्या लग्नात नवीन माणसे असतात तेव्हाच वापरते. ते काय आहे ना दर वेळी तोच तोच शालू वापरला तर इतर बायका हसतील असे तिला वाटते.” 🤣
“शालू आणि कोट कुठे आहेत?”
“वॉर्डरोब मध्ये. जागा अडवतायत. 🤦♂️ 🤦♀️” 🤣
“बरं ते जाऊ द्यात. हा क्रोकरी सेट छान आहे. 💎 👌 कधी घेतला?”
“फार वर्षे झाली.”
“कधी वापरला जातो?”
“एकदाच वापरला. मोलकरणीने त्यातला एक बाउल फोडला. सेटमध्ये ३६ पीस होते, आता ३५ पीस राहिलेत.” 🤦♂️ 🤦♀️ पैशांचा अपव्यय ! 🤣 ! आईला-सासुला, गरीब पुतण्याला देणार नाहीत 🤦♂️
“मग दुसरा बाउल आणायचा ना!”
“अहो, तसाच मिळत नाही ना… मग ही म्हणाली, मोलकरणींच्या राज्यात नकोच वापरायला.” 🤣
“मग कुणाच्या राज्यात वापरणार?”
“हो ना. तो प्रश्नच आहे. ही म्हणते क्रोकरी वापरली की धुवायचे काम हिलाच करावे लागते. मोलकरणीचा भरवसा नाही कधी फोडतील ती. मग ही म्हणते नकोच वापरायला. आठ हजाराचा सेट पडून आहे.” 😠
“शोकेसमध्ये छान दिसतो पण.” 🤣
“हो ना. आलेल्या पाहुण्यांना फार आवडतो. सगळे म्हणतात छान आहे. पण बाउल फुटल्यापासून हिचे मनच उडाले आहे.” 🤣
“बरं, अजून काय काय आहे जे वापरात नाही असे.”
“ बरेच !….खूप आहे कि. राईस कुकर, ओव्हन, पोळ्या लाटायचे मशीन, कॉफी मशीन, स्युईंग मशीन. आणखी काय काय आहे बघावं लागेल. ” 👌 🤣
“व्वा! चालू द्यात. चला निघतो मी.” 🤦♀️♂️ 🤣
* * * * * * * * * * * * * * *
उगाच हसू नका. 😊 तुमच्या घरात काही वेगळे नाही 😊 . तुम्हांला विचारले तर तुमची उत्तरेदेखील अशिच, हीच असणार. 😊 🤣 पण तुम्हांला सांगतो तुम्ही फार बरे. काही काही जण तर अक्खी कार घेऊन ठेवतात आणि महिन्यातून एकदा काढतात battery चार्ज करण्यासाठी 🤣. काही लोक सेकंड होमदेखील असेच उगाच नासिक, पुना, मुंबई,तळेगावला घेतात 😖. काही लोक फार्म हाउस घेतात कोकणात आणि पाच वर्षांत एकदाच जातात 🤣 तर रस्ताच विसरलेले असतात.. प्लॉट शोधत बसतात आणि पाच वर्षांपूर्वीच्या खुणा शोधत बसतात. 🤣
तुम्ही फार बरे आहात. थोडक्यात आहे अजून
असो !. येतो मी !.
चहा पुढच्या वेळी घेऊ. ! ! !
विवेक जागृत ठेवा,
आनंदात राहू शकाल,…..
लेखक : अज्ञात
प्रस्तुती : श्री सुनील देशपांडे
मो – 9657709640
email : [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈