श्रीमती उज्ज्वला केळकर
वाचताना वेचलेले
☆ अप्रूप पाखरे – 24– रवींद्रनाथ टैगोर ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆
[११३]
सत्य उठवतं
एक प्रचंड वादळ
आपल्याच विरुद्ध
ज्यातून पुन्हा
दशदिशांना विखुरतात
सत्याची बीजं
[११४]
माझ्या घरी ये
असं नाहीच म्हणत
मी तुला
प्रिय,
तू माझ्या
अनंत एकटेपणात
येशील?
[११५]
कधीही घाबरू नकोस
क्षणांना
शाश्वताचा आवाज
मंद लयीत
झिरपत असतो
क्षणांमधूनच
[११६]
खोलवर सुकून गेलेला
हा अफाट-सुका पसारा
त्यातून उसळावी
अस्सलवाणी दाद
सरगम बनून
तशी दरवळते आहे
मृद्गंधाची ही धून
मूळ रचना – स्व. रविंद्रनाथ टैगोर
मराठी अनुवाद – रेणू देशपांडे (माधुरी द्रवीड)
प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर
176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.- 9403310170
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈