वाचताना वेचलेले
☆ काय निवडायचं ? – – फटाके 💥 की पुस्तके 📚 …कवी : अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆
☆
फटाके मोठा आवाज ⚡करतात.
पुस्तके शांतपणे हळूवार भेटतात.
*
फटाके हवेचं प्रदूषण करतात.
पुस्तके वैचारिक प्रदूषण दूर करतात.
*
फटाके अक्षरशः पैसे जाळतात.
पुस्तके मात्र पैसे उभे करतात.
*
फटाके लहानग्यांना इजा करतात
पुस्तके बाळांना 👶छान रमवतात
*
फटाके पक्षीप्राण्यांना घाबरवतात
पुस्तके सर्व माहिती पोहोचवतात
*
फटाके कान किर्रर करुन सोडतात.
पुस्तके मानसिक समाधान 🧠देतात.
*
फटाके माणसाचा अहंकार कुरवाळतात.
पुस्तके माणसाला जमिनीवर ठेवतात.
*
फटाके विध्वंसक मूल्य 🔥रुजवतात.
पुस्तके रचनेचा आग्रह धरतात.
*
फटाके क्षणभर प्रकाशातून अंधाराकडे नेतात.
पुस्तके तिमिरातूनी तेजाकडे वळवतात.
*
फटाके म्हणजे बालमजूरीला प्रोत्साहन.
पुस्तके म्हणजे बालबुद्धीला आवाहन.
*
फटाके ही तर खरीखुरी विकृती.
पुस्तके च उभी करती मानवी संस्कृती.
*
भूषण नित्य वाजवी विवेकाची घंटा
फटाक्यास फाटा देवूनि पुस्तकेच वाटा
*
आता काय निवडायचं तुम्हीच ठरवा !
विवेकाचा आवाज बुलंद करु या….
☆
(🙏पालकांना हात जोडून विनंती की या दिवाळीला मुलांना फटाक्याऐवजी काही पुस्तके घेऊन द्या )
कवी :अज्ञात
प्रस्तुती: सुश्री मीनल केळकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈