सौ.अस्मिता इनामदार
विविधा
गौराईकडून गृहिणींना पत्र… अज्ञात प्रस्तुती – सौ.अस्मिता इनामदार
प्रिय सखी,
मजेत गेले माझे दिवस..तू माझ्यासाठी प्रेमाचा आणि कष्टाचा किती घाट घातलास हे मी याची देही याची डोळा पाहिले..मी पाहिले तुझी धडपड आणि अविरत काम करणं..मी येणार म्हणून सोवळ्याचा अट्टाहास…पाळी पुढे ढकलण्याचे सगळे प्रकार….काही वेळा डोळे भरुन आले आणि काही वेळा हसू न आवरण्यासारखे झाले…मग आम्ही दोघीनी ठरवलं की चल आज तुझ्याशीच गप्पा मारू…जसं आम्ही माहेरपणाला येतो तसं तू कुठे गेलीस का गं , ???? आमच्यासाठी पंचपक्वानं, सोळा भाज्या केल्यास पण तू एकटी असताना शिळं पाकं खाऊन राहणं कसं जमतं????? आमच्यासाठी खेळ खेळलेस पण तुझ्यासाठी रोजचा व्यायाम करतेस का गं? आणि हो आम्हाला जेवढा मान तू देतेस ,तेवढा स्वत:ला मान कधी देतेस का गं??? जाता जाता एक सांगू …जेवढं स्वत:ला जपशील तेवढं आम्हाला तू तुझ्यात पाहशील..
कधीही कानांनी अनहेल्दी ऐकू नकोस…तोच तो इडियट बॉक्स सुरू असतो तो आणि डोळ्यांनी अनहेल्दी पाहू नकोस…स्वतःमध्ये ,….. जसं पंचपक्वानं जसं तयार करतेस तसंच नविन कला शिकत जा, छंद जोपासत जा , स्वतःला वेळ दे..जगत जननीपण इतकं कॅज्युअली घेऊ नकोस…कारण जिच्यामध्ये जन्म देण्याची क्षमता आहे तिने स्वतःला जपलेच पाहिजे…आणि आवर्जून सांगते आता जिवंत गौरायांनों थोडासा आराम करा…असूया, गॉसिपिंग आणि जग काय म्हणतं याचा विचार न करता ,स्वत:ला नव्याने घडवा…आमच्या चेहऱ्यावरचं तेज पाहून जसं तुम्ही खुलता तसं तुमच्या चेहर्या वरच्या तेजाने सारं जग बदलू दे…सोवळं नक्की पाळा पण ते तुमच्या विचारांचे …गोळ्या घेऊन पाळया लांबविण्यापेक्षा आरोग्याचा जागर करा..बाकी पुढच्यावर्षी भेटू तेव्हा मला तू माझ्यासारखी दिसली पाहिजेस..मानसिक, शारीरिक सामाजिक आणि आध्यात्मिक हेल्दी!!!!
तुझीच ,
गौरी
– अनामिक
संग्राहिका : – अस्मिता इनामदार
पत्ता – युनिटी हाईटस, फ्लॅट नं १०२, हळदभवन जवळ, वखारभाग, सांगली – ४१६ ४१६
मोबा. – 9764773842
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈