सौ पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई
☆ विविधा ☆ झोका ☆ सौ पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆
गणेश वाडी सारख खेडगाव. बरीच भावंड मिळून झोका खेळत होती वेंण्णाला कोणीतरी मोठा झोका दिला. आणि ती खाली पडली त्या झोक्याने तीच आयुष्यच बदलवून टाकलं डावा हात मोडला. कोणताच उपचार लागू पडेना. सात आठ वर्षाची वेण्णा कळा सहन करत होती. अखेर मिरजेच्या मिशन हॉस्पिटल मध्ये नेलं. डॉक्टरांनी हात कुमारला लागल्याने तो काढण्याचा निर्णय सांगितला. अर्ध्या दंडापर्यंत हात काढला. मुलीची जात, सगळं आयुष्य जायचं कसं? सगळे काळजीत पडलेप.
रोज वेण्णा आणि आई एकमेकीला धीराचे शब्द देत होत्या. हळूहळू उजवा हात आणि पुढचे दात यांनी परकर बांधता यायला लागला. पोलक्याची बटण लावता यायला लागली. निसर्गनियमाप्रमाणे वेण्णा वयात आली. 9 वारी लुगडं दात पोटाजवळ नेऊन गाठ बांधून, चापून-चोपून नेसायला लागली.
मोठे भाऊ पुण्याला घेऊन गेले. सेवासदन शाळेत घातले. सातवीपर्यंत शिकली. सुंदर मोत्यासारख अक्षर होत . काही दिवसांनी परत आईकडे आली. आणि आणि आता ती भाकरी, पोळ्या, विणकाम, भरत काम पायाच्या अंगठ्याच्या मदतीने करू लागली प्रत्येक काम सुबक करण्यात तिचा कटाक्ष असे. भांडी,धुणं अगदी चकाचक असायचं. आता प्रश्न लग्नाचा.
गजानन गोडबोले नावाचा देखणा, आई-वडील नसलेला मुलगा सांगलीला अग्निहोत्री नातूंकडे रहायला होता. पूजा आणि प्रवचन हेच उत्पन्न. त्याचा आर्थिक प्रश्न आणि देण्याचा व्यंगाचा प्रश्न दोन्ही एकत्र येऊन उत्तर मिळाले. लग्न ठरलं. आणि आणि झालंही. एका हाताने सगळे विधी पार पडले. संसार सुरू झाला. शांत गजाननराव थोडी तापट वेण्णा. पण रसायन छान आलो होत. कमाईही वाढली होती.वेण्णाला तीन मुली नंतर मुलगा झाला. स्वतः च घर झालं. दुसरे महायुद्ध झालं आणि आर्थिक सुरु झाली. थोडा भाग भाड्याने दिला.धाकटी मुलगी 8 महिन्याची लहान. गजानन रावांना हृदयविकाराच्या झटक्याने देवाज्ञा झाली.वेण्णा हात पाय गाळणारी नव्हती. खंबीर झाली. प्रवचनाला येणारे गुजराती लोक महिना शिधा द्यायला लागले जोडीला घर भाडे होते. मुलींची लग्न, बाळंतपण सगळं सगळं एक हात कष्ट करत होता. मुलगा नोकरीला लागला. आता तिला आयुष्याची संध्याकाळ दिसायला लागली
आता वेण्णा एका खोलीत एकटीच रहायला लागली. सत्तर वर्ष काम केलेला हात आणि पुढचे दात दुखायला लागले. दोन्ही काम करेनासे झाले तर मी परस्वाधीन म्हणून रोज देवाला प्रार्थना करायची. सांगलीची नाळ सुटत नव्हती. थोडे दिवस मुलाकडे हरिहरेश्वरला निघाली.
बस भरलेली होती. गाव जवळ आल आणि काय झालं कळायच्या आत बस उतारावरून खाली पडली. आरडा ओरडा चालू झाला. कुणीतरी वेण्णाला उचलून खाली दगडावर बसवले. डोक्याला मार लागला होता. मोडके तोडके शब्द तोंडून बाहेर पडले. ‘सर्वजण सुखी रहा’. दुसरा हात उभा राहू शकत नव्हता. पण पण अर्ध्या दंडा पर्यंतचा थोटुक,लेण्याला परस्वाधीन न करता सर्वांचा कायमचा निरोप घेत होतं. वर खाली वर खाली होत होता. एखाद्या झोक्या सारखा! झोका
गणेश वाडी सारख खेडगाव. बरीच भावंड मिळून झोका खेळत होती वेंण्णाला कोणीतरी मोठा झोका दिला. आणि ती खाली पडली त्या झोक्याने तीच आयुष्यच बदलवून टाकलं डावा हात मोडला. कोणताच उपचार लागू पडेना. सात आठ वर्षाची वेण्णा कळा सहन करत होती. अखेर मिरजेच्या मिशन हॉस्पिटल मध्ये नेलं. डॉक्टरांनी हात कुमारला लागल्याने तो काढण्याचा निर्णय सांगितला. अर्ध्या दंडापर्यंत हात काढला. मुलीची जात, सगळं आयुष्य जायचं कसं? सगळे काळजीत पडलेप.
रोज वेण्णा आणि आई एकमेकीला धीराचे शब्द देत होत्या. हळूहळू उजवा हात आणि पुढचे दात यांनी परकर बांधता यायला लागला. पोलक्याची बटण लावता यायला लागली. निसर्गनियमाप्रमाणे वेण्णा वयात आली. 9 वारी लुगडं दात पोटाजवळ नेऊन गाठ बांधून, चापून-चोपून नेसायला लागली.
मोठे भाऊ पुण्याला घेऊन गेले. सेवासदन शाळेत घातले. सातवीपर्यंत शिकली. सुंदर मोत्यासारख अक्षर होत . काही दिवसांनी परत आईकडे आली. आणि आणि आता ती भाकरी, पोळ्या, विणकाम, भरत काम पायाच्या अंगठ्याच्या मदतीने करू लागली प्रत्येक काम सुबक करण्यात तिचा कटाक्ष असे. भांडी,धुणं अगदी चकाचक असायचं. आता प्रश्न लग्नाचा.
गजानन गोडबोले नावाचा देखणा, आई-वडील नसलेला मुलगा सांगलीला अग्निहोत्री नातूंकडे रहायला होता. पूजा आणि प्रवचन हेच उत्पन्न. त्याचा आर्थिक प्रश्न आणि देण्याचा व्यंगाचा प्रश्न दोन्ही एकत्र येऊन उत्तर मिळाले. लग्न ठरलं. आणि आणि झालंही. एका हाताने सगळे विधी पार पडले. संसार सुरू झाला. शांत गजाननराव थोडी तापट वेण्णा. पण रसायन छान आलो होत. कमाईही वाढली होती.वेण्णाला तीन मुली नंतर मुलगा झाला. स्वतः च घर झालं. दुसरे महायुद्ध झालं आणि आर्थिक सुरु झाली. थोडा भाग भाड्याने दिला.धाकटी मुलगी 8 महिन्याची लहान. गजानन रावांना हृदयविकाराच्या झटक्याने देवाज्ञा झाली.वेण्णा हात पाय गाळणारी नव्हती. खंबीर झाली. प्रवचनाला येणारे गुजराती लोक महिना शिधा द्यायला लागले जोडीला घर भाडे होते. मुलींची लग्न, बाळंतपण सगळं सगळं एक हात कष्ट करत होता. मुलगा नोकरीला लागला. आता तिला आयुष्याची संध्याकाळ दिसायला लागली
आता वेण्णा एका खोलीत एकटीच रहायला लागली. सत्तर वर्ष काम केलेला हात आणि पुढचे दात दुखायला लागले. दोन्ही काम करेनासे झाले तर मी परस्वाधीन म्हणून रोज देवाला प्रार्थना करायची. सांगलीची नाळ सुटत नव्हती. थोडे दिवस मुलाकडे हरिहरेश्वरला निघाली.
बस भरलेली होती. गाव जवळ आल आणि काय झालं कळायच्या आत बस उतारावरून खाली पडली. आरडा ओरडा चालू झाला. कुणीतरी वेण्णाला उचलून खाली दगडावर बसवले. डोक्याला मार लागला होता. मोडके तोडके शब्द तोंडून बाहेर पडले. ‘सर्वजण सुखी रहा’. दुसरा हात उभा राहू शकत नव्हता. पण पण अर्ध्या दंडा पर्यंतचा थोटुक, लेण्याला परस्वाधीन न करता सर्वांचा कायमचा निरोप घेत होतं. वर खाली वर खाली होत होता. एखाद्या झोक्या सारखा!
© सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई
पत्ता- ‘पुष्पानंद’ बुधगावकर मळा रस्ता मिरज, जि. सांगली
फो नं. ०२३३-२२१२१५१ मो. ९४०३५७०९८७
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈
याला जीवन ऐसे नाव.