सुश्री दीप्ती कोदंड कुलकर्णी
☆ विविधा ☆ देशातील विकासात महिलांचा सहभाग ☆ सुश्री दीप्ती कोदंड कुलकर्णी ☆
पारतंत्र्याच्या काळात जेंव्हा स्त्रीचे कार्यक्षेत्र हे फक्त ‘चूल आणि मूल’ होते, तेंव्हा स्त्रीवर खूपच बंधने होती. पण त्यापूर्वी च्या गार्गी आणि मैत्रेयीं सारख्या विदुषींना आपण विसरुन चालणार नाही. सावित्रीबाई फुलेंनी स्त्रियांना शिक्षणाची द्वारे खुली करुन दिली नि स्त्रिया शिक्षित होऊ लागल्या. स्त्रियांना शिक्षणाची द्वारे खुली होताच त्यांनी विविध क्षेत्रात घोडदौड केलेली दिसते. आज १०वी, १२वी पासून पदवी वपदव्युत्तर स्तरावरील गुणवत्ता यादी पाहिली तर अनेक टप्प्यावर महिला आघाडीवर आहेत असेच दिसते. महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि भारतीय लोकसेवा आयोगातही स्त्रियांनी अनेक परीक्षातगुणवत्तेसह यश संपादणुक केली आहे स्त्रिया एकाच वेळी घर आणि घराबाहेरील कार्यक्षेत्र ही कुशलतेने हाताळू शकतात हे आज स्पष्ट झाले आहे. याचे मुख्य कारण असे की बुद्धीबरोबरच सहनशीलता, चिकाटी व परिश्रमी व्रुत्ती या बाबींची महिलांना विशेष देणगीच लाभली आहे.स्त्रिया मोठ्या नेटाने आणि जिद्दीने परिस्थिती वर मात अरतात असे आज समाजात पदोपदी दिसून येते.
स्वातंत्रयानंतर आजतागायत शिक्षण, क्रुषी,विज्ञान, दक्षणवळण, राजकारण, समाजकारण, अशा सर्वच क्षेत्रात स्त्रियांची प्रगती लक्षणीय ठरली आहे. देशाच्या विकासात विविध क्षेत्रात स्त्रियांनी आदर्श निर्माण केले आहेत. १५आँगस्ट १९४७ला सरोजिनी नायडू यांना अनुक्रमे पहिल्या महिला गव्हर्नर होण्याचा
आणि पहिल्या कँबिनेट मंत्री होण्याचामान पटकावला. सुचेता क्रुपलानी १९६३ मध्ये उत्तर प्रदेशच्या पहिल्या स्त्री मुख्यमंत्री बनल्या. १९५९ला पहिल्या स्त्री न्यायाधीश भारतास मिळाल्या तर १९६६ला इंदिरा गांधींनी पहिले स्त्री पंतप्रधान पद भूषविले. १९७२ला किरण बेदी या स्त्री ने महिला पोलीस सेवेत येण्याचा विक्रम केला. १९७९मध्येतर मदर तेरेसांनी शांतीचे नोबेल पारितोषिक प्राप्त केले. १९८४मध्ये बचेंद्री पाल या एका अद्वितीय स्त्री ने एव्हरेस्ट हे पर्वतशिखर पादाक्रांत केले. १९९९ मध्ये सोनिया गांधी राजकारणात स्त्री नेत्या बनल्या. करनाम मल्लेश्वरीने आँलिम्पिकमध्ये पदक मिळवून क्रीडा क्षेत्रात ठसा उमटविला तर पी. टी उषा भारताची सुवर्णकन्या बनली.साहित्य क्षेत्रात ही डॉ. विजया वाड यांच्यासारख्या महिलेने उत्तुंग कामगिरी केली आहे. इतकेच काय तर सन २००७मध्ये मा.प्रतिभाताई पाटील या देशाच्या सन्माननीय राष्ट्रपती बनल्या. २०१४ला मा.पंतप्रधान मोदींच्या मंत्रीमंडळात ७महिला मंत्रीपदी विराजमान झाल्या. सुस्मिता बोस, अरुंधती राँय सारख्या लेखिका, शांता शेळके यांच्यासारख्या लेखिका, बाँर्डर सुरक्षा विभागातील अधिकारी, लढाऊ वैमानिक, नौदल अधिकारी अशी सर्व महत्वाची पदे आज स्त्रिया अत्यंत जबाबदारी ने पेलत आहेत. अर्थमंत्री मा.निर्मला सीतारामन या आज भारताच्या अर्थमंत्री आहेत. नुकतेच त्यांनी अर्थसंकल्प(बजेट) जाहीर केले आहे.
स्त्रियांची ही दैदिप्यमान कामगिरी पाहता देशाच्या विकासात महिलांचे स्थान अनन्यसाधारण आहे हे आज सिद्ध झाले आहे.
“जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धरी”. या उक्तीनुसार स्त्रिया भावी पिढीवर सुसंस्कारही करीत आहेत. म्हणूनच कुटुंबाचा नि त्याचबरोबर देशाचा विकासही महिला सक्षमतेने करीत आहेत. कला,क्रीडा, साहित्य, विज्ञान, मनोरंजन, राजकारण, समाजकारण, अर्थकारण अशा सर्वच क्षेत्रात महिलांचा सहभाग लक्षणीय आहे.ऐश्वर्या राँय-बच्चन, प्रियंका चोप्रा इ.सारख्याबुद्धी आणि सौंदर्याचा मिलाफ असणार्या स्त्रिया ही आज जगामध्ये भारताची एक नवी ओळख करुन देत आहेत. देश, राज्य, जिल्हा, गाव अशा सर्वच पातळ्यांवर सरपंच, नगरसेविका, महापौर मंत्री अशा सर्व प्रकारची पदे कौशल्याने हाताळून यशस्वी होत आहेत. म्हणून च स्त्रियांच्या प्रगतीचा आलेख आज उंचावलेला दिसत आहे.
शेवटी इतकेच म्हणावे वाटते कि कष्टकरी महिला, ग्रुहिणी, नि उच्चपदस्थ अशा देशातील सर्वच महिलांना फक्त ८मार्च या एका जागतिक महिला दिनीच चांगली, सन्मानाची वागणुक देऊ नये तर महिलांशी नेहमीच सौजन्याने, आदराने वागावे कारण म्हंटलेच आहे
“यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता”
© सुश्री दीप्ती कोदंड कुलकर्णी
भ्र.9552448461
कोल्हापूर
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈