सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई
विविधा
☆ देशाची समृद्धी भारतीय रेल्वे – भाग -2 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆
(चरैवेति चरैवेति)
[नागपूर येथून प्रसिद्ध होणा-या ‘राष्ट्रसेविका’ या अंकासाठी सौ.पुष्पा प्रभू देसाई यांच्या भारतीय रेल्वेवरील लेखाची निवड झाली आहे. तो आपल्या वाचनासाठी चार भागात देत आहोत.]
भारतीय रेल्वेच्या उत्पादन संस्था केंद्रीय मंत्रालयाच्या अखत्यारित येतात१) डिझेल लोकोमोटिव कार्यशाळा.,–वाराणसी., २)चित्तरंजन लोकोमोटिव कार्यशाळा–चित्तरंजन. ३) डिझेल लोको अधुनिक कार्यशाळा–पतियाळा. ४)इंटिग्रल कोच फँक्टरी–चेन्नई. ५)रेल कोच फँक्टरी कपूरथळा. ६)रेल व्हील फँक्टरी बंगळुरू. ७)रेल स्प्रिंग कारखाना — ग्वाल्हेर.
रेल्वेची प्रशिक्षण केंद्रेही अनेक ठिकाणी आहेत. १) इंडियन रेल्वे इन्स्टिट्यूट ऑफ मेकॅनिकल अँड इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग– जमालपुर. २)रेल्वे स्टाफ कॉलेज –बडोदा। ३) इंडियन रेल्वे इन्स्टिट्यूट ऑफ सिग्नल इंजीनियरिंग अंड हेवी कम्युनिकेशन — सिकंदराबाद. ४)इंडियन रेल्वे इन्स्टिट्यूट ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंग –पुणे। ५)इंडियन रेल्वे इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग –नासिक. सेंटर फॉर रेल्वे इन्फर्मेशन सिस्टीम ही रेल्वे बोर्डाच्या नियंत्रणाखालील स्वतंत्र संस्था आहे. ती भारतीय रेल्वेसाठी संगणक प्रणालीचा विकास करते.
रेल्वे गाड्यांचे ही किती प्रकार सांगावेत१)उपनगरीय. २) एम.एम.यू. ३)डी. एम.यू.– डिझेल मल्टिपल युनिट. ४)डोंगरी. ५) पॅसेंजर ६) एक्सप्रेस ७)अतीजलद ८) वातानुकूलित. ९) वातानुकुलीत सुपरफास्ट. १०) जनशताब्दी ११) शताब्दी. १२) संपर्क क्रांती. १३) गरीब रथ १४) राजधानी. १५) दूरांतो. १६) दुमजली १७) अंत्योदय. १८) उदय. १९) तेजस . २०) हमसफर . तसेच पॅलेस ऑन व्हील्स ही विशेष गाडी राजस्थान सरकारने पर्यटन वाढवण्यासाठी सुरू केली भारत-पाकिस्तान दरम्यान समझोता एक्सप्रेस सुरू केली होती, पण आता की सुरू नाही. अपघाताच्या ठिकाणी लाईफ लाईन एक्सप्रेस काम करते. पुणे–नाशिक हाय स्पीड ला हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे . मुंबई-दिल्ली मालगाडी साठी वेगळा मार्ग टाकणे चालू आहे. मुंबई– अहमदाबाद बुलेट ट्रेन चे काम चालू आहे. श्रीरामचंद्रांच्या स्थळांची तीर्थयात्रा करण्यासाठी, भारतीय रेल्वे “रामायण एक्सप्रेस ” सुरू करत आहे . सोळा रात्री आणि सोळा दिवस, प्रवास (१६०६५रु,.भाडे.).ए.सी.साठी (२६७७५ रु.). रेल्वेच्या वारसा यादीत अग्रणी असणाऱ्या आणि ९० वर्षे जुन्या असलेल्या, डेक्कन क्वीनचे मध्य रेल्वे आता रूप पालटणार आहे. जर्मन तंत्रज्ञान आधारित डबे, विशेष सुरक्षा व्यवस्था, आकर्षक बाह्यरूप, आरामदायी प्रवास, विशेष लोगो अशा सुधारणा आहेत.
भारतीय रेल्वेने प्रवाशांना गरजेप्रमाणे निरनिराळ्या वर्गांचे डबे केले आहेत.आरक्षित, द्वितीय, प्रथमवर्ग, खुर्चीयान, वातानुकूलित खुर्चीयांन, प्रथम आणि द्वितीय शयनयान, वगैरे. जोड मार्गिका वापरून, डबे एकमेकांना जोडले गेल्यामुळे, प्रवासी आतल्या आत एका डब्यातून दुसऱ्या डब्यात जाऊ शकतात.
क्रमशः….
© सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई
बुधगावकर मळा रस्ता, मिरज.
मो. ९४०३५७०९८७
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈