प्रा.डॉ.सतीश शिरसाठ
विविधा
☆ बिनचेह-याची माणसं रेखाटणारा चित्रकार… ☆ प्रा.डॉ.सतीश शिरसाठ ☆
पुणे विद्यापीठातल्या प्रौढ, निरंतर शिक्षण आणि ज्ञानविस्तार विभागात मी रूजू झालो त्यावेळी विद्यापीठ कक्षेतल्या पाच जिल्ह्यांतल्या शेकडो महाविद्यालयांमधून प्रौढ शिक्षण कार्यक्रम धडाक्यात चालू होता.कार्यकर्त्यांची शिबीरं,प्रशिक्षण कार्यक्रम, मेळावे इथपासून राष्ट्रीय, विभागीय चर्चासत्रं,कृतिसत्रं सतत होत होती. विविध स्तरावरच्या कार्यकर्त्यांची उठबस इथं नेहमीच असायची. विविध पुस्तकं, नियतकालिकं, वर्तमानपत्रं यांचा इथं खच पडलेला असायचा. भितींवर अनेक तक्ते, पोस्टर्स आणि चित्रं असायची. त्यात एक चित्र उठून दिसायचं. एक माणूस या विभागाची दिशा दाखवत असलेले हे चित्र होते. एअर इंडियाच्या महाराजाच्या वेषात हा माणूस आदबीनं उभा होता. पण या माणसाला चेहरा नव्हता. त्या ठिकाणी प्रौढ शिक्षणाचं चिन्ह होतं-गोलात इंग्रजी वाय आकार. वायमध्ये एक भरीव ठिपका. या चित्राचे मला नेहमी कौतुक आणि कुतूहलही वाटत असे. आयडिया भन्नाट होती. कुणाकडून तरी कळलं की, आपल्या विभागात एक चित्रकार होते रामनाथ चव्हाण नावाचे. त्यांनी अशी बरीच चित्रं काढली होती.
चित्रकार रामनाथ चव्हाण
केवळ रेखाटलेल्या चित्राला व्होकॅब्युलरी पिक्चर म्हणतात. त्यापेक्षा आशयघन कन्सेप्ट पिक्चर्सना प्रौढ शिक्षणात महत्वाचे मानले जाते.चव्हाणांची चित्रं कन्सेप्ट पिक्चर्स होती. चव्हाणांविषयी मी खूप ऐकून होतो.सर्वसामान्य नव्हे तर गरिब घरातून जिद्दीनं पुढं आलेल्या या युवकाला त्याच्या विचारांच्या माणसांची साथ इथं मिळाली.
© प्रा.डाॅ.सतीश शिरसाठ
ईमेल- [email protected]
मो व वाटसॅप नं. – ९९७५४३५१५२
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈