श्रीमती अनिता जयंत खाडीलकर
☆ विविधा ☆ मैत्री ☆ श्रीमती अनिता जयंत खाडीलकर ☆
फ्रेंडशिप, मैत्री किती छान कल्पना त्यादिवशी फ्रेंडशिप डे होता. सर्वजण एकमेकांना फ्रेंडशिप ब्याण बांधून आपल्या मैत्रीची एकमेकांना आठवण करून देत होते. मी हे सगळं पहात होते. माझ्या मनात विचार आला. याप्रसंगावर चार ओळी तरी लिहाव्यात. म्हणून मी कागद पेन घेऊन बसले. आणि कविता लिहू लागले. तीच ही कविता.
फ्रेंडशिप
फ्रेंडशिप ही कल्पना आहे किती छान
एकच दिवस असतो मैत्रीचा मान
तीच असते या दिवसाची शान
रोजच्या जीवनात नसतं याच भान
पण आठवण होताच वाटतं किती छान
एकमेकांना होतात फोन
गर्दीने भरतात गावांचे कोन
गप्पांच्या फडात रहात नाही वेळेचं भान
आठवणीचे गोफ विणले जातात छान
एकमेकांना बांधतात फ्रेंडशीपचे बँण
सगळेच असतात एकमेकांचे फँन
जीवनाच्या फेऱ्यात होतात अनेक प्लॉन
केव्हातरी होतात छोटी छोटी भांडण
मनमोकळ बोलण्याचं हेच असतं ठाणं
कारण ह्यात नसतं कोणतच बंधन
आठवणीने मनं होतात म्लान
भेटल्यावर होतात परत भेटण्याचे ल्पॉन
भेट न झाल्यामुळे होतं रुदन
विचारांचे होते मंथन
मनांचं होतं मिलन
अन् भावनांचं होतं प्रज्वलन
शंकाचं होतं शमन
संकटकाळी होतं जीवाचं रान
असच असतं मैत्रीचं अतुट बंधन
मैत्रीचं महत्त्व अन् किर्ती महान
त्यावर होतं कवनांच गान
त्यानं भरतं पेपराचं पान
वातावरण ही होतं खूप छान
खरच फ्रेंडशीप ही कल्पना फारच महान
बघा कशी वाटते.
© श्रीमती अनिता जयंत खाडीलकर
सह्याद्री अपार्टमेंट, खाडीलकर गल्ली, बालगंधर्व नाट्यमंदिर समोर, ब्राह्मणपुरी, मिरज,जि. सांगली
मो 9689896341
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈