श्री अमोल अनंत केळकर

☆ विविधा ☆ वासुदेव… ☆ श्री अमोल अनंत केळकर ☆ 

जरा विसावू या वळणावर

मंडळी नमस्कार, इंग्रजी वर्ष २०२० चा हा शेवटचा मंगळवार म्हणजेच यावर्षी साठीचा हा शेवटचा स्तंभ लेख. अजून २ दिवसात हे वर्ष संपेल. केंव्हा एकदा हे वर्ष संपतय असं सगळ्यानाच वाटतयं, याची कारणे सांगण्याची गरजच नाही, ती प्रत्येकाला माहिती आहेतच. अर्थात १ जानेवारी २०२१ पासून लगेच काही चांगले घडेल असे नाही. किंबहुना नवीन नवीन बातम्या येत असताना परिस्थिती तशीच राहण्याची शक्यता जास्त दिसते आहे.

काही खास दिवस असतात ज्या दिवसांपासून आपण नवीन सुरवात करु, झालेल्या चूका टाळू, नव्या जोमाने कामाला लागू, जास्त प्रयत्न करु असे वाटते त्यातील एक दिवस म्हणजे नवीन वर्षाचा पहिला दिवस.

अनेक जण नवनवीन ठराव/ नियम ( दरवर्षी प्रमाणे)  ठरवतील, अनेक जण पूर्णत्वास नेतील. आमच्यासारख्या काहीजणांचा वेळ दरवर्षी प्रमाणे डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात पुढील वर्षात काय करता येईल (नवीन) हे चाचपण्यातच जाईल. तरी देखील यामागची भावना महत्वाची ठरेल.

मोठ्याला कंपन्या आपला ताळेबंद मार्च एन्डींग झाल्यावर मांडतात. १ एप्रिल पासून त्यांचे नवीन फायनान्शीअल वर्ष सुरु होते. अनेक व्यापारी दिवाळीत ( पाडवा) नवीन चोपडी घेऊन नववर्षाची सुरवात करतात. सामान्य जण एक तर वाढदिवस किंवा बहुतेक वेळा नवीन वर्ष हे आपल्या इव्हाॅल्यूएशन साठी धरतात. १ तारीख आली नवीन वर्ष कसे जाईल यासाठी जोतिषांकडे ही अनेकांची विचारणा होते.

म्हणूनच हे वळण मला महत्वाचे वाटते आणि प्रत्येकाने  ‘भले बुरे जे घडून गेले’ ते विसरून नव्या वळणावर नव्या उर्मीने तयारीत राहिले पाहिजे.

मंडळी यावर्षी मी काय नवीन गोष्ट शिकलो सांगू?  तर यावर्षी मी आत्तापर्यंत कधीही न खेळलेला मोबाईल गेम ‘ कॅन्डी क्रॅश ‘ खेळलो. एकदम भारी. मस्त गेम आहे. दिलेली टास्क  सुटून पुढच्या लेवलला गेलं की भारी वाटायचं. सध्या १५१ च्या पुढं असेन. पण सुरवातीच्या सोप्या लेवल नंतर एक एक लेवल सुटायला २-२ दिवस लागू लागले. कधी कधी हरतोय असं वाटत असतानाच अचानक शेवटच्या क्षणी लेवल सुटायची. मग त्या येणाऱ्या स्माईली वगैरे वगैरे. किंवा मग out of moves, level failed, you did not reach the goal हे तर ठरलेले. मग परत पहिल्यापासून ती लेवल यात पण एकच लेवल ठराविक वेळा खेळून ही सुटली नाही की हा खेळ एक टाइम लिमीट देतो. १० मिनिटांन पासून ते ३० मिनिटांपर्यत तुम्हाला हा खेळ खेळताच येत नाही. तोवर तुम्ही कदाचित इतर काही कराल पण हा खेळ खेळू शकणार नाही. त्या टाईम लिमीट नंतर परत सुरवात करायची खेळाला.

काही येतंय लक्षात ☝?. अशी लेवल म्हणजे जीवनात येणाऱ्या अडचणी. सुटत नसतील तर थोडं थांबायचे. चक्क दुर्लक्ष करुन दुस-या गोष्टीत मन रमवायचं आणि ‘जरा विसावू या वळणावर’ नंतर नव्या जोमाने कामाला लागायचं. पटतयं का सांगा.

आणि थोड्या कालावधी नंतर जिवनातील अवघड गणित/ त्रासदायक काळ /परिस्थिती  सुटायला लागली  की आपणच आपणाला शाबासकी द्यायची आणि म्हणायचं

wonderful, level completed

मंडळी आजची , टवाळखोरी आवरती घेता घेता, आज श्रीदत्त जयंती निमित्य दत्तमहाराजांच्या कृपेने येणारे नवीन वर्षे  सर्वांना सुखाचे ( ब्रह्मा), समाधानाचे( विष्णू) आणि चांगल्या आरोग्याचे( महेश्वर)  जावो या सदिच्छा

( शुभेच्छूक)  अमोल+

©  श्री अमोल अनंत केळकर

२०/७/१८

नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

 

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments