सौ. विद्या पराडकर
🌳 विविधा 🌳
☆ स्वातंत्र्य 🇮🇳 ☆ सौ. विद्या पराडकर ☆
भारताचा स्वातंत्र्य दिन चिरायू होवो!💐
स्वातंत्र्याच्या निर्मात्यांना आमुचे लाख प्रणाम💐
७६ वर्षे झालीत
पण स्वातंत्र्य मिळाले कुणाला?🌸
या देशातील सामान्य नागरिक
स्वातंत्र्यापासून वंचितच राहिला ☘️
स्वातंत्र्य वीरांच्या बलिदानाचा पायावर
ज्यांनी आपल्या इमारती बांधल्या
त्यांना स्वातंत्र्य उपभोगण्यास मिळाले
बाकीचे मात्र कोरडेच राहिले.🌸
स्वातंत्र्य सूर्याची किरणे शिरली
मोठमोठ्या बंगल्यात, महालात
पण झोपड्या अन् घरे मात्र
राहिलीत नेहमीच अंधारात 🌸
आपण सारे हिंदुस्तान निवासी
म्हणतात सारे तोंडाने
स्वार्थापोटी हेच निवासी
हेच निवासी एकमेकांचे शत्रू होतात
कृतीने
या देशात आहे निस्वार्थी
म्हणून च इतरांचा स्वार्थ साधतो
देशभक्त आहेत
म्हणूनच देशद्रोही सुखी आहेत.☘️
स्वातंत्र्य, समता, बंधुता
सारे काही सोंग आहे
स्वतंत्रतेच्या मात्र पायात
विषमतेची श्रुंखलाआहे☘️
खरी लोकशाही आहे अर्थहीन
सुरु आहे बेबंदशाही चे थैमान
चंगळ वादाला आला बहर
पतन होते लोकशाहीचे, नागरिकांचे
सर्व राजकीय पक्षांचे🌸
करण्या यशस्वी लोकशाही
घ्या हो शपथ राष्ट्रीय एकात्मतेची
होळी करा हो सत्तांध भावनेची
स्वातंत्र्याचा अखंड दीप गवसेल तेव्हा 🌸
© सौ. विद्या पराडकर
वारजे पुणे.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈