(आज प्रस्तुत है श्री गणेश चतुर्थी पर्व पर कविराज विजय यशवंत सातपुते जी की विशेष कविता वंदन हे स्वीकार.)
☆ वंदन हे स्वीकार ☆
एकदंत तू ,वरद विनायक, वंदन हे स्वीकार
कार्यारंभी करतो पूजन तुझाच जय जय कार.
तिलकुंदाचे केले लाडू, गुंफीयेला जास्वंदीचा हार
दुर्वादल ते लक्ष अर्पिले , देवा आळवीत ओंकार.
सहस्त्र रूपे ,तुझी दयाळा , सृजनशील दरबार
माघ चतुर्थी ,जन्मोत्सव हा, शोभे निर्गुण निराकार.
गाणपत्य तू ,बुद्धी दाता, करीशी चराचरी संचार
कृपा असावी आम्हावरती , कर जीवन हे साकार.
अक्षर अक्षर दैवी देणे, मूर्त शारदा शब्दाकार
गणाधीश तू, ईश गुणांचा, देवा कलागुण स्वीकार.
तुला पूजिले, देहमंदिरी, देना जीवनाला आधार
जन्मा आला, जगत नियंता, देवा शब्दपुष्प स्वीकार.
यशश्री, 100 ब दीपलक्ष्मी सोसायटी, सहकार नगर नंबर दोन, पुणे 411 009.
मोबाईल 9371319798.