(आज प्रस्तुत है श्री गणेश चतुर्थी पर्व पर कविराज विजय यशवंत सातपुते जी की विशेष कविता/वंदना गणराजाला करूनी वंदन .)
☆ गणराजाला करूनी वंदन ☆
ग णराजाला करूनी वंदन
गा था गाऊ शिवपुत्राची
गि रीजा सूत तू विघ्नेश्वर
गी ता तुझीया नामाची.
गु णेश मुर्ती सदा अंतरी
गू ढ गुंजनी तुझी स्मृती
गे ही माझ्या वास असावा
गै रवाजवी नको कृती.
गो पुर होई अक्षर माझे
गौ रव सारा भक्तीचा.
गं मत जंमत तुझ्या उत्सवी
गः वर्ण हा सौख्याचा.
© विजय यशवंत सातपुते
यशश्री, 100 ब दीपलक्ष्मी सोसायटी, सहकार नगर नंबर दोन, पुणे 411 009.
मोबाईल 9371319798.