(समाज , संस्कृति, साहित्य में ही नहीं अपितु सोशल मीडिया में गहरी पैठ रखने वाले कविराज विजय यशवंत सातपुते जी की सोशल मीडिया की टेगलाइन “माणूस वाचतो मी……!!!!” ही काफी है उनके बारे में जानने के लिए। जो साहित्यकार मनुष्य को पढ़ सकता है वह कुछ भी और किसी को भी पढ़ सकने की क्षमता रखता है।आप कई साहित्यिक, सांस्कृतिक एवं सामाजिक संस्थाओं से जुड़े हुए हैं । आप प्रत्येक शुक्रवार को उनके मानवीय संवेदना के सकारात्मक साहित्य को पढ़ सकेंगे। आज इस लेखमाला की शृंखला में पढ़िये तरुणों में व्याप्त व्यसन जैसी एक सामाजिक समस्या पर विचारणीय आलेख “व्यसनाच्या आहारी गेलेला तरूण वर्ग”)
☆ समाज पारावरून – साप्ताहिक स्तंभ – पुष्प दहावे # 10 ☆
☆ व्यसनाच्या आहारी गेलेला तरूण वर्ग ☆
माणसाला माणूस जोडण्याचे, माणसात रहाण्याचे व्यसन असावे असे संस्कार आमच्या वर झाले. त्यामुळे व्यसनाधीनता हा विषय जिव्हाळ्याचा वाटला. आजची तरुण पिढी मुबलक पैसा, कुतूहल, अनुकरण आणि सुखासीन आयुष्य जगण्याची सवय यामुळे जास्तीत जास्त व्यसनाधीन होत आहे. समाज पारावरून हा विषय हाताळताना अनेक पैलू समोर येतात. वर वर साधी वाटणारी ही समस्या अतिशय गंभीर स्वरूप धारण करीत आहे.
मी माझ्या मुलाला काहीही कमी पडू देणार नाही ही पालकांची भूमिका पाल्याला व्यसनी बनवायला कारणीभूत ठरते आहे. कुटुंबातील नात्यांमधे हरवत चाललेला संवाद हे ही प्रमुख कारण आहेच. एकटे रहाण्याची सवय व्यसनाला पोषक वातावरण तयार करते आणि समवयस्क मुलांना असलेली व्यसने संगती दोषामुळे आपोआप स्वतःला चिकटतात. तारूण्यात असलेली बेफिकीर वृत्ती व्यसनाला कारणीभूत ठरते. काही होत नाही कर ट्राय ही चिथावणी सार आयुष्य बरबाद करते.
घर दार, कुटुंब , म्हणजे काय हे समजून घ्यायच्या आतच आजचा तरूण व्यसनाधीन होतो आहे. अंगावर कौटुंबिक जबाबदाऱ्या नसल्याने खुशालचेंडू आयुष्य जगणारा युवक स्वतःसाठी जास्त जगताना आढळतो. हे स्वतःसाठी जगणे म्हणजे हवे तसे जगणे असा अर्थ घेऊन तो जगतो आहे. पैसा हे मूळ कारण यात कारणीभूत आहे. पैसा कमवायची सवय, गरज निर्माण होण्याआधी तो खर्च कसा करायचा याचा विचार करणारी तरूण पिढी व्यसनाच्या इतकी आहारी जाते की ते व्यसन त्यांच्या जगण्याच्या एक भाग होऊन बसते.
एखाद्या कुट॔बात वडिल धारे व्यसनी असतील तर मात्र तरूण पिढी आपोआपच व्यसनाधीन होते. समाजरूढी परंपरा यामुळे घरची स्त्री अजूनही सजगतेने या व्यसनी व्यक्तीला सांभाळून घरदार सावरत आहे. ताण तणाव दुंख निराशा या भावना स्त्रीयांनाही आहेत. पण जबाबदारी माणसाला माणूस बनवते आणि या मुळेच स्त्रीया कणखर पणे यातून मार्ग काढीत आहेत. नव्या पिढीच्या काही तरूणी व्यसनाधीन होत आहेत त्याला कौटुंबिक वातावरण जास्त जबाबदार आहे.
नशा, दारू हे व्यवसाय समाजान वाढवले आहेत. आणि हा समाज आपणच आहोत तेव्हा वैयक्तिक पातळीवर आपण व्यसनाधीनतेला आळा कसा घालता येईल यावर जास्त कठोर पणे उपाययोजना करायला हवी. मुलगा वयात येताना बापाने व्यसनाधीनतेचे प्रदर्शन टाळले आणि मुलाशी सुसंवाद साधला तरी मुलगा व्यसनापासून दूर राहू शकतो. चांगले झाले तर मी केले आणि वाईट झाले तर देवाने, नशीबाने, सरकारने केले ही विचारधारा जोपर्यंत आपण बदलत नाही तोपर्यंत हे सरकार देखील यात काही ठोस निर्णय घेऊ शकणार नाही असे मला वाटते.
व्यसनाधीनता रोखणे आपल्या हातात आहे पण व्यसनाधीनता थांवण्यासाठी सरकारला दोष देणे मला पटत नाही. सर्व दोष व्यक्ती कडे असताना परीस्थिती हाताबाहेर गेल्यावर सरकारकडून मदतयाचना करणे हा या समस्येवर तोडगा नाही. आपण समजूत दार आहोत.
आम्ही व्यसन मर्यादित ठेवले आहे अशी फुशारकी मारणारे देखील कौटुंबिक संवादात अपयशी ठरले आहेत. तेव्हा व्यसन ही समस्या गंभीर आहे ती सोडविण्यास जागरूकता महत्वाची आहे. जबाबदारी पेलताना माणूस म्हणून वैचारिक संस्कार सुशिक्षित पिढीवर करण्याची वेळ आली आहे. तंबाखू, दारू, सिगारेट नशा हे सर्व आपण स्वीकारलेले विकार आहेत त्याचा विनाश करण्यासाठी त्यांचा त्याग करणे, हा मोह टाळणे अतिशय योग्य आहे.
दुसऱ्याला अमूक एक गोष्ट करू नको हे सांगण्यापेक्षा आपल्या माणसाला व स्वतःला (जर व्यसन असेल तर )परावृत्त करणे जास्त सोपे आहे. तरूण आपणही होतो. आपण केलेल्या चुका मुलांनी करू नये एवढी काळजी जरी प्रत्येकाने घेतली तरी तरूण पिढी यातून वाचू शकेल.
यशश्री, 100 ब दीपलक्ष्मी सोसायटी, सहकार नगर नंबर दोन, पुणे 411 009.
मोबाईल 9371319798.