(समाज , संस्कृति, साहित्य में ही नहीं अपितु सोशल मीडिया में गहरी पैठ रखने वाले कविराज विजय यशवंत सातपुते जी की सोशल मीडिया की टेगलाइन “माणूस वाचतो मी……!!!!” ही काफी है उनके बारे में जानने के लिए। जो साहित्यकार मनुष्य को पढ़ सकता है वह कुछ भी और किसी को भी पढ़ सकने की क्षमता रखता है।आप कई साहित्यिक, सांस्कृतिक एवं सामाजिक संस्थाओं से जुड़े हुए हैं । आप प्रत्येक शुक्रवार को उनके मानवीय संवेदना के सकारात्मक साहित्य को पढ़ सकेंगे। )
☆ साप्ताहिक स्तंभ –समाज पारावरून – पुष्प तेरावे # 13 ☆
☆ नात्यात येणारा दुरावा ☆
आजकाल नाते संबध ही मानवी भावना राहिली नसून तो एक व्यवहार झाला आहे असे खेदाने म्हणावेसे वाटते. . नाते विश्वास, स्वभाव दोष, आकलन क्षमता आणि अनुभव यावर सर्वस्वी अवलंबून असते. नाते ही नैतिक जबाबदारी आहे हे जोपर्यंत मनात रूजत नाही तोपर्यंत हे नाते मनापासून निभावले जाऊ शकत नाही. .
मी कसा श्रेष्ठ आणि विद्वान हे सिद्ध करण्यात प्रत्येक जण इतरांच्या भावनांशी खेळतो आहे. या स्पर्धेचे युगात पैशाच्या जोरावर नातेसंबंध हवे तसे जोपासले जात आहेत. भ्रष्टाचार, लाच या गोष्टी ठराविक समाजात शिष्टाचार बनत चालल्या आहेत. दुरावा होण्याची आणखी कारणे आहेत ती म्हणजे संशय आणी षडरिपू . रक्ताचे नाते समाज काय म्हणेल या भावनेतून किंवा क्षुल्लक स्वार्थ साधण्यासाठी निभावले जाते. संशयाने मनभेद आणि मतभेद होतात. मन एकदा का दुखावले गेले की आपलेपणा जाऊन परकेपणा निर्माण होतो.
नाते पैशात मोजायचे की शब्दात हे ज्याला समजले तो कुठलेही नाते छान सांभाळू शकतो. नातेवाईक आपल्याला काय देतात , आपण त्यांना काय दिले यापेक्षा मी आप्तांना काय देऊ शकत नाही ते देण्यासाठी जर निस्वार्थीपणे प्रयत्न केला तर नाते आदर्श निर्माण करू शकते. समाज पारावरून हा विषय चर्चेला घेताना समाज नाते दृढ करणारी माणसे आता अभावानेच आढळतात. हे सत्य डावलून चालणार नाही.
नात्यात हेतू नसावा, बंधुता आणि मानवता साधण्यासाठी आपण स्नेहाच्या दोन शब्दांनी बांधलेला सेतू नात्यात कधीही नष्ट नाही होणारे स्नेहबंध प्रस्थापित करते. ही सर्व नाती टिकून राहण्यासाठी आपण सर्वांशी मिळून मिसळून रहाणे जमले की नात्यांची नाळ जुळलीच समजा .
रक्ताची पण नाती मांडव शोभेपुरती हवा तीतका पैसा खर्च करतात. शब्दाची शस्त्रे नात्याला दूर करतात पण मानसिक भावबंध माणसाला कायम निराशेच्या अंधकारातून उजेडाचा मार्ग दाखवतात.माणसाला क्षणैक मोहाचे आकर्षण नातेसंबंधात दरी निर्माण करीत आहे.
नाते भावनेशी, मनाशी जितकी जवळीक साधते तितके पैलू या पा-याला , नातेसंबंधाना सहवासात आपोआप पडतात. ते कसे जपायचे याचे कौशल्य अनुभवाने अंगवळणी पडते. सा-या जाणिवा नेणिवा या नात्याला घडवितात अन बिघडवतात देखील. आपण मधल्या मधे आपल्यातला माणूस जीवंत ठेवला की झालं.
नाते, विश्वास, माणूसकी , आणि स्वभाव दोष विसरून दुसर्याला माफ करण्याची क्षमाशीलता
या गोष्टीवर सर्वस्वी अवलंबून असते. नात्याला भावनांचे असलेले रेशमी स्नेहबंध जोपासायला शिकलो की आपोआपच नात्यातला दुरावा कमी होतो. मुळातच नाते ही संकल्पना माणूस जोडण्यासाठी उपयोगात आणता येते हे जोपर्यंत आपण मनापासून स्वीकारत नाही तोपर्यंत ते नाते आपण समर्थपणे निभावून नेऊ शकत नाही. माणूस दूर राहूनही नातेसंबंध उत्तम जोपासू शकतो. माणसा माणसात मतभेद असावेत पण मनभेद होणार नाहीत याची काळजी घेतली की नात्यात कधीही दुरावा येणार नाही.
© विजय यशवंत सातपुते
यशश्री, 100 ब दीपलक्ष्मी सोसायटी, सहकार नगर नंबर दोन, पुणे 411 009.
मोबाईल 9371319798.