कविराज विजय यशवंत सातपुते

 

(समाज , संस्कृति, साहित्य में  ही नहीं अपितु सोशल मीडिया में गहरी पैठ रखने वाले  कविराज विजय यशवंत सातपुते जी  की  सोशल मीडिया  की  टेगलाइन माणूस वाचतो मी……!!!!” ही काफी है उनके बारे में जानने के लिए। जो साहित्यकार मनुष्य को पढ़ सकता है वह कुछ भी और किसी को भी पढ़ सकने की क्षमता रखता है।आप कई साहित्यिक,  सांस्कृतिक  एवं सामाजिक संस्थाओं से जुड़े हुए हैं ।  इस साप्ताहिक स्तम्भ के माध्यम से वे किसी न किसी सामाजिक  अव्यवस्था के बारे में चर्चा करते हैं एवं हमें उसके निदान के लिए भी प्रेरित करते हैं।  आज श्री विजय जी ने एक गंभीर विषय “नैसर्गिक आपत्ती ” चुना है।  श्री विजय जी ने प्राकृतिक आपदाओं  जैसे गंभीर मुद्दे पर इस आलेख में चर्चा की है।  ऐसे ही  गंभीर विषयों पर आप प्रत्येक शुक्रवार को उनके मानवीय संवेदना के सकारात्मक साहित्य को पढ़ सकेंगे।  )

 

☆ साप्ताहिक स्तंभ –समाज पारावरून – पुष्प पंधरावे # 15 ☆

 

☆ नैसर्गिक आपत्ती ☆

 

समाजपारावरून आज निसर्ग  आपत्ती विषयी जरा बोलावेसे वाटत आहे.  निसर्गाचे संरक्षण,  आणि संवर्धन जर  आपल्या हातून घडले तर हाच निसर्ग  आपल्याला वनौषधी, रानमेवा  आणि  आरोग्य संपदेने परीपूर्ण करू शकतो.

अतिवृष्टी, ढगफुटी, हिम वर्षाव, कोरडा दुष्काळ, उन्हाचा तडाखा, वाढते  उष्णता मान, वणवा, वन्यजीव,  पशुपक्षी यांच्या प्रजाती संख्या कमी होणे,  औषधी वनस्पतींचा -हास, चक्रीवादळ,भुकंप, (धरणीकंप),  कडाक्याची  थंडी,  हहवामानात झालेले प्रतिकूल बदल ,अशा प्रकारच्या नैसर्गिक आपत्ती आपण  अनुभवीत आहोत. …..

या  आपत्तीच्या काळात सर्व संकटग्रस्तांना  वेळेवर  मदत मिळतेच असे नाही.   वित्त हानी, जीवहानी, आणि मनस्ताप भोगत या नैसर्गिक आपत्तींना सामोरे जावे लागते. नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा निश्चित करून  या समस्येवर मात करता येईल.  पण नैसर्गिक आपत्ती ही बहुधा  अचानक पणे उद्भवल्याने ही समस्या गंभीर स्वरूप धारण करते.  निसर्ग हानी देखील  अशा वेळी मोठय़ा प्रमाणावर झालेली दिसते.

पर्यावरण प्रेमी संघटना,  त्यांनी केलेले सर्वेक्षण याची नोंद कुठेतरी व्हायला हवी.   कारण  नैसर्गिक आपत्ती कोसळल्यावर  मनुष्य भांबावून गेलेला असतो.  त्याला  अन्न,  वस्त्र,  निवारा, या मुलभूत गरजा कशा लवकरात लवकर पुरवता येतील  याचा पाठपुरावा प्रसार माध्यमांनी करायला हवा.

जगाच्या  कानाकोप-यात घडणा-या घटनांना विविध नैसर्गिक घडामोडींना मिडीयाच जनतेपर्यंत पोहोचवतो.  मिडियाने  प्रसारीत केलेले लघुपट,  निवूदन  पाहून  अनेक वेळा विविध उपाय योजना सरकारने राबलिल्या आहेत.

आजकाल मिडिया  हेच प्रभावी माध्यम आहे की ज्याचे मुळे आपण सावधान आणि जागरूक राहू शकतो. आदिवासी भागातील तसेच मागास वर्गीय लोकांना पुरेशा सेवा सुविधा उपलब्ध करून दिल्या. नैसर्गिक धन संपत्ती चे महत्त्व समजावून त्याचे संवर्धन करण्यासाठी प्रोत्साहन दिले तर बर्‍याच नैसर्गिक आपत्ती टाळता येतील.

वरातीमागून घोडे मिरविण्यापेक्षा मिडीया चा वापर दुर्गम भागातील नागरिकांना  उपलब्ध करून दिल्यास त्यांना काही संरक्षण दिले गेल्यास वनसंपदेचे जतन  आणि संवर्धन होऊ शकते.  नैसर्गिक आपत्ती हे संकट आले तरी त्याला तोंड देण्याची क्षमता आधुनिक तंत्रज्ञानात नक्कीचआहे. फक्त त्याचा वापर समयोचित व्हायला हवा.

प्रसारमाध्यमे ही केवळ पैसा आणि प्रसिद्धी साठी  अस्तित्वात नसून समाज कल्याण  आणि समाजप्रबोधनाचे महत्त्व पूर्ण कार्य सातत्याने करीत आहेत.  स्वतःचे संसार बाजूला ठेवून हे छायाचित्रकार,  तंत्रज्ञ पूर्ण ताकदीनिशी  अपु-या सेवा सुविधा  असताना मोठय़ा साहसाने सचित्र माहिती गोळा करून त्याचे अभ्यास पूर्ण संकलन करीत  असतात. त्याची शासकीय दरबारी कुठेतरी दखल घेतली जावी  असे मला वाटते.  प्रसार माध्यमांनी जीवावर उदार होऊन दिलेल्या माहितीवरून शासनाने झोपेतून जागे व्हायचे  आणि संकटग्रस्तांना मदत केल्याचा देखावा निर्माण करायचा हे कुठेतरी थांबायला हवे.  सरकारने  उपाययोजना करताना  अशा प्रसार माध्यमांना  आवश्यक त्या सेवा सुविधा उपलब्ध करून दिल्यास  ही निसर्गाची हानी काही प्रमाणात कमी करता येईल.  सध्याचे युग प्रगतीचे,  विकासाचे आणि माहिती व तंत्रज्ञानाचे आहे हे विसरून चालणार नाही.  नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनात याचा विचार शासकीय पातळीवर सर्वतोपरी व्हायला हवा असे मला वाटते.

 

✒  © विजय यशवंत सातपुते

यशश्री, 100 ब दीपलक्ष्मी सोसायटी,  सहकार नगर नंबर दोन, पुणे 411 009.

मोबाईल  9371319798.

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments