श्री अशोक श्रीपाद भांबुरे
(वरिष्ठ मराठी साहित्यकार श्री अशोक श्रीपाद भांबुरे जी का अपना एक काव्य संसार है । आप मराठी एवं हिन्दी दोनों भाषाओं की विभिन्न साहित्यिक विधाओं के सशक्त हस्ताक्षर हैं। आज साप्ताहिक स्तम्भ –अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती शृंखला की अगली कड़ी में प्रस्तुत है एक भावप्रवण कविता “माझा परिचय”।)
☆ साप्ताहिक स्तम्भ – अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 21 ☆
☆ माझा परिचय ☆
प्रदूषणाने घटे तुझे वय
मी वनवासी नसे मला भय
ताड माड हे माझे स्वामी
सांगतील ते माझा परिचय
त्यांच्या चरणी सेवा माझी
मिळे सावली नाही संशय
वृक्ष वल्लरी सखे सोयरे
त्यांचे माझे नाते अक्षय
कसे जगावे वृक्ष सांगती
पानोपानी हिरवा आशय
फळा-फुलांची ही वनराई
त्यांची कत्तल तुझा पराजय
निसर्ग करतो वृक्षारोपण
नाही फोटो नाही अभिनय
© अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८