श्री सुजित कदम
(श्री सुजित कदम जी की कवितायेँ /आलेख/कथाएँ/लघुकथाएं अत्यंत मार्मिक एवं भावुक होती हैं. इन सबके कारण हम उन्हें युवा संवेदनशील साहित्यकारों में स्थान देते हैं। उनकी रचनाएँ हमें हमारे सामाजिक परिवेश पर विचार करने हेतु बाध्य करती हैं. मैं श्री सुजितजी की अतिसंवेदनशील एवं हृदयस्पर्शी रचनाओं का कायल हो गया हूँ. पता नहीं क्यों, उनकी प्रत्येक कवितायें कालजयी होती जा रही हैं, शायद यह श्री सुजितजी की कलम का जादू ही तो है! आज प्रस्तुत है बाल्यपन पर आधारित एक अतिसुन्दर कविता बालपण…! )
☆ साप्ताहिक स्तंभ – सुजित साहित्य #21☆
☆ बालपण…! ☆
मी गात असताना
लेकराची
हार्मोनियम वर सफाईदारपणे
फिरणारी
बोटं पाहिली की
ओठांवर येणारे
शब्द शहारतात
थरथरतात…
ऐकत रहावसे वाटतात
फक्त त्याच्या
इवल्या इवल्या बोटांमधून
ऐकू येणारे सूर
डोळ्यांच्या पाणवठ्यावर
येऊन मी उभा राहतो
साठवून घेतो…
त्याची प्रत्येक हरकत,नजाकत
त्याचा प्रसंन्न चेहरा
आणि बरंच काही
माझ्या ओठांमधून येणा-या
बोथड शब्दांना तो
तो देत असतो जगण्याची
सुंदर लय….
आणि मी मात्र त्यांच्यामध्ये
शोधत राहतो माझ
प्रौढ होत गेलेलं बालपण…!
© सुजित कदम, पुणे
7276282626