श्री सुजित कदम
(श्री सुजित कदम जी की कवितायेँ /आलेख/कथाएँ/लघुकथाएं अत्यंत मार्मिक एवं भावुक होती हैं. इन सबके कारण हम उन्हें युवा संवेदनशील साहित्यकारों में स्थान देते हैं। उनकी रचनाएँ हमें हमारे सामाजिक परिवेश पर विचार करने हेतु बाध्य करती हैं. मैं श्री सुजितजी की अतिसंवेदनशील एवं हृदयस्पर्शी रचनाओं का कायल हो गया हूँ. पता नहीं क्यों, उनकी प्रत्येक कवितायें कालजयी होती जा रही हैं, शायद यह श्री सुजितजी की कलम का जादू ही तो है! आज प्रस्तुत है एक अतिसुन्दर कविता पान हिरवे… )
☆ साप्ताहिक स्तंभ – सुजित साहित्य #23☆
☆ पान हिरवे… ☆
पान हिरवे झाडाचे
वा-यासंगे गाते गाणे
शिवाराच्या त्या मातीला
भेटायाचे पान म्हणे. . . . !
जाते बोलून मनीचे
झाड बिचारे ऐकते
ऊन वा-याचे तडाखे
बळ झुंजायाचे देते. .. . !
स्वप्न पाहण्यात दंग
पान हिरवे झाडाचे
वयानूरुप सरले
गूढ गुपित पानाचे. . . . . !
हळदीच्या रंगामध्ये
पान हिरवे नाहते
सोन पिवळ्या रंगात
रूप त्याचे पालटते. . . . !
झाडालाही हुरहुर
पान पिवळे होताना
रंग हिरवा देठात
मातीमध्ये पडताना. . . . !
© सुजित कदम, पुणे
7276282626