(आज प्रस्तुत है सुश्री प्रभा सोनवणे जी के साप्ताहिक स्तम्भ “कवितेच्या प्रदेशात” में उनकी बीस वर्ष पूर्व लिखी हुईअतिसुन्दर कविता “पिंपळवृक्ष ”. सुश्री प्रभा जी की यह कविता मुझे निःशब्द करती हैं, कोई भी टिपण्णी करने से । कविता में दादी माँ का कथन – “माँ को बच्चे कीओर इस तरह एकटक नहीं देखना चाहिए” ही अपने आप में एक कविता है। अठारह – बीस वर्षों में बच्चे का शरीर ही नहीं अपितु परिवार भी वृक्ष की तरह बढ़ जाता है। शेष आपका दृष्टिकोण कुछ और हो सकता है। सन्दर्भ विचारार्थ तथा उसमें निहित साहित्यिक अनुभव भी अपने आप में एक अविस्मरणीय ऐतिहासिक दस्तावेज है। इस अतिसुन्दर कविता के लिए वे बधाई की पात्र हैं। उनकी लेखनी को सादर नमन ।
मुझे पूर्ण विश्वास है कि आप निश्चित ही प्रत्येक बुधवार सुश्री प्रभा जी की रचना की प्रतीक्षा करते होंगे. आप प्रत्येक बुधवार को सुश्री प्रभा जी के उत्कृष्ट साहित्य का साप्ताहिक स्तम्भ – “कवितेच्या प्रदेशात” पढ़ सकते हैं।)
☆ साप्ताहिक स्तम्भ – कवितेच्या प्रदेशात # 35 ☆
☆ पिंपळवृक्ष ☆
(बावीस वर्षापूर्वी ची कविता (मृगचान्दणी मधून))
झोळीत झोपलेल्या,
तुझ्या गोलमटोल, गोब-या गोब-या..
तीट लावलेल्या
चेह-या वरून आणि सुकुमार अंगावरून…
फिरून फिरून नजर फिरविताना पाहून…
आजी म्हणाली एकदा,
“आईनं असं एकटक पाहू नये बाळाकडे”
आज ताडमाड वाढलेल्या,
तुझ्या सडसडीत शरीरयष्टीकडे पहाताना-
तूच म्हणतोस..
“बघ किती वाळलोय ना मी ?
तुझं लक्षच नाही माझ्या कडे”
आणि मग तरळून गेला नजरे समोरून….
गेल्या अठरा वीस वर्षाचा इतिहास…
तसं फार लक्षपूर्वक वाढवलंच नाही तुला,
तरीही वाढलास तू-
स्वयंभू सळसळत्या पिंपळवृक्षासारखा !
परवा म्हटलं कुणीतरी-
“तुमचा मुलगा बाणेदार आहे!”
तेव्हा आठवलं पुन्हा…
आजीचं वाक्य –
“आईनं असं एकटक पाहू नये बाळाकडे”
☆ विचारार्थ ☆
माझा आवडता शेर विनोद खन्ना यांनी रेडिओ वर ऐकवलेला,
कंधा न देना मेरी मैय्यत को
कही जी न उठे सहारा पाकर
शाळेत असताना ऐकलेला साहिर लुधियानवी यांचं” तलखियाँ” हे पुस्तक विकत घेऊन वाचलं होतं! मीनाकुमारी ची शायरी आवडायची!
इलाही जमादारांशी ओळख झाली, आणि गझल जास्त आवडायला लागली, बालगंधर्व च्या कॅफेटेरियात इलाहींना ऐकलं आणि आपण कविता करणं सोडून द्यावं असं वाटलं, इतकी मी त्यांच्या गझल ऐकून भारावले होते!
इलाही अनेकदा घरी यायचे गझल ऐकवायचे,माझ्या कविता ऐकायचे, ते म्हणाले होते, तुम्ही “आपकी नजरोने समझा ……ही गझल गुणगुणत रहा तुम्हाला गझल सुचेल! पण तसं झालं नाही!
इलाहींच्या प्रभावाने मीनल बाठे व शरद पाटील गझल लिहू लागले! मी मीनल बाठे बरोबर सुरेश भट यांना भेटायला गेले तेव्हा मी गझल लिहित नव्हते, पण सुरेश भटांनी मला कविता म्हणायला सांगितलं आणि माझ्या मुक्तछंदातल्या पिंपळवृक्ष या कवितेला सुरेख दाद दिली!
पुढे मीनल ने क्षितीज ही गझलप्रेमी संस्धा काढली त्यात मी होते या संस्थेची पहिली बैठक इलाही यांच्या उपस्थितीत झाली त्यात मी माझी पहिली गझल सादर केली होती १९९३ साली—-त्यातले दोन शेर …
का असे डोळ्यात पाणी पावलांनो
स्वैर आभाळी तुम्हा का वाव नाही
आणि
संपता आयुष्य माझे भेटण्या ये
मरण यात्रेला कुणा मज्जाव नाही
माझ्या पहिल्या गझल ला ही कुणी इस्लाह केला नाही, या गझल च्या पहिल्या शेरात वृत्त चुकलं होतं, शरद पाटील ने सांगितले पहिल्या शेरात गडबड आहे, काय गडबड आहे ते त्याला सांगता आले नाही, मलाही कळलं नाही मी माझ्या पहिल्या कविता संग्रहात तशीच छापली आहे. पुढे डाॅ राम पंडित यांचे लेख वाचून लगावली, वृत्त वगैरे समजलं मग तो शेर माझा मीच दुरूस्त केला!
मी खुप ढोबळमानाने गझल लिहू लागले पण नंतर कळले त्या वृत्तबद्ध आहेत, माझा फार अभ्यास नाही पण माझ्या गझल लेखनाने मला खुप समाधान दिलं आहे! काही काही शेर तर माझं मलाच आश्चर्य वाटतं मी कसे लिहिले असतील!
पण माझ्या सर्व गझला सहज सुलभ सुचलेल्या, मी आटापिटा कधीच केला नाही इस्लाह करून घेतला नाही या क्षेत्रात कुणीही गुरू नाही, मानायचंच झालं तर डाॅ राम पंडित यांचे लेख हेच गुरू! गझल समजली, हातून लिहून झाली. काही काळ एक झपाटले पण आलं! देवप्रिया वृत्तातली एक गझल नाशिकला किशोर पाठक यांना ऐकवली ते म्हणाले, “छान आहे पण गझल मध्ये अडकून पडू नकोस!”
गझल हा काव्यप्रकार सुंदरच आहे खरोखर ती वृत्तीच असावी, पण मुक्तछंदातली कविता ही जबरदस्त असते! गझल, वृत्तबद्ध कविता, मी फार अभ्यासू नसूनही हाताळता आले हे खुप छान वाटतं…..पण प्रत्येक कवीला गझल रचताच आली पाहिजे असं काही नाही, प्रत्येक कवीचा पिंड वेगवेगळा असतो!
हल्ली मला वैभव जोशी च्या गझल खुप आवडतात!
बोलला सायलेंटली पण जाब मागत राहिला
रात्रभर माझ्या उशाशी फोन वाजत राहिला
– वैभव जोशी
© प्रभा सोनवणे
“सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011
मोबाईल-९२७०७२९५०३, email- [email protected]
धन्यवाद हेमंतजी ।आपकी प्रस्तावना बहुत सुन्दर है ।
धन्यवाद हेमंतजी, आपकी प्रस्तावना बहुत सुन्दर है ।
आपका आभार