सुश्री प्रभा सोनवणे
(आज प्रस्तुत है सुश्री प्रभा सोनवणे जी के साप्ताहिक स्तम्भ “कवितेच्या प्रदेशात” में “लाॅकडाऊन चे दिवस “। सुश्री प्रभा जी एवं विश्व में कई लोगों के जीवन में ऐसे अनुभव आये हैं जब हमने जीवन का एक नया भयाक्रांत स्वरुप देखा है। पारिवारिक संबंधों में प्रगाढ़ता एवं जीवन जीने का नया सलीका सीखा है या कहें कि समय ने हमें सिखा दिया है। मानव मन परिवर्तनशील है । भीषण आपदा से गुजरने के बाद शिक्षा लेने के बजाय बुरे दिन जल्दी ही भूल जाता है । ईश्वर करे उसे सद्बुद्धि दे । आरोग्य से बढ़ कर कोई धन नहीं । आइये हम सब मिल कर सुश्री प्रभा जी की प्रार्थना की दो पंक्तियों को सामूहिक स्वरुप दें । कहते हैं सामूहिक प्रार्थना ईश्वर अवश्य सुनते हैं। इस मानवीय संवेदनाओं से पूर्ण रचना लिए उनकी लेखनी को सादर नमन ।
मुझे पूर्ण विश्वास है कि आप निश्चित ही प्रत्येक बुधवार सुश्री प्रभा जी की रचना की प्रतीक्षा करते होंगे. आप प्रत्येक बुधवार को सुश्री प्रभा जी के उत्कृष्ट साहित्य को साप्ताहिक स्तम्भ – “कवितेच्या प्रदेशात” पढ़ सकते हैं।)
☆ साप्ताहिक स्तम्भ – कवितेच्या प्रदेशात # 48 ☆
☆ लाॅकडाऊन चे दिवस ☆
22 मार्च ला “कोरोना विषाणू” चा फैलाव रोखण्यासाठी सर्वत्र कर्फ्यू ठेवण्यात आला. आम्ही पुण्यात सोमवार पेठेत रहातो, माझा मुलगा, सून, नातू पिंपळेसौदागर ला! सध्या मुलगा कंपनी च्या कामासाठी सिंगापूरमध्ये आहे, या शैक्षणिक वर्षात सून आणि नातू सिंगापूरला जाणार होते, तसं प्लॅनिंगही झालं पण अचानक आलेली ही “कोरोना” ची आपत्ती, कर्फ्यू च्या आदल्या दिवशी सून आणि नातू पिंपळेसौदागरहून सोमवार पेठेत रहायला आले..
अलीकडे माझी तब्येत बरी असत नाही, शुगर, बीपी बरोबरच आता कमरेचं दुखणं, कर्फ्यू नंतर कामवालीला येऊ नकोस म्हणून सांगितलं…..
सून सुप्रिया आणि नातू सार्थक आल्यामुळे घराला घरपण आलं,आल्या आल्या सूनबाईंनी सफाई मोहिम हाती घेतली, तिच्या येण्यानंच घर उजळून निघालं, आज महिनाभर आम्ही एकत्र आहोत , भांड्याला भांडं ही लागलं नाही की आवाज ही झाला नाही, सारं कसं सुरळीत चाललंय…तू तू मै मै करायची मानसिकताच नाही….
“कोरोना” चं हे जागतिक संकट…सगळेच हवालदिल, सतत टीव्ही वर “कोरोना” बाधितांचे आणि मृतांचे आकडे…..या संकटाचं निवारण व्हावं म्हणून ईश्वराची प्रार्थना!
नातवाची घरातली किलबिल सुखावणारी, सुरूवातीचे काही दिवस तो कंटाळायचा…एकटाच ना ! खेळायला मित्र नाहीत…पण त्याला वाचनाची आवड आहे, चित्रकलेची आवड आहे, तो वाचतो, चित्र काढतो, टेरेसवरच्या बागेत जातो, व्यायाम करतो, घरातल्या कामातही मदत करतो, आम्ही पत्ते खेळतो, सापशीडी, कॅरम खेळतो,
आम्ही टीव्ही वर सिनेमा, रामायण, महाभारत पहातो! घरातली सगळी कामं स्वतः करावी लागताहेत, बराचसा भार सूनबाईंनी पेललाय!
अमंगळ टळेल, जगरहाटी परत सुरू होईल, पण हे लाॅकडाऊन चे दिवस ….समजूतदार दिवस कायम आठवणीत रहातील. एखाद्या “गढी” मध्ये रहाणा-या बायका जशा पूर्वी रहायच्या चार भिंतीत तसंच….फरक इतकाच की नोकर चाकर कुणी नाही, धुणी भांडी, स्वयंपाक पाणी, झाडू पोछा….सारं कसं बिनबोभाट….चार भिंतीत! सतत कानावर येतंय, घरात रहा, सुरक्षित रहा! तेच स्विकारलंय,गरजा खुप कमी झाल्यात…..एक वेगळं जग पहातोय, अनुभवतोय…. शेवटी हे कळतंय जान है तो जहां है!
हे निवांत आयुष्य पुन्हा वेग घेईल ! परिस्थिती माणसाला बरंच काही शिकवेल शहाणं करेल, लाॅकडाऊन चा “हा सिझन” मोठी कामगिरी करून दाखवेल. ॥शुभम् भवतु ॥
सा-या जगाचसाठी मागेन दान देवा
आरोग्य दे इथे हा लाभो अमोल ठेवा
© प्रभा सोनवणे
“सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011
मोबाईल-९२७०७२९५०३, email- [email protected]