श्री अशोक श्रीपाद भांबुरे
(वरिष्ठ मराठी साहित्यकार श्री अशोक श्रीपाद भांबुरे जी का अपना एक काव्य संसार है । आप मराठी एवं हिन्दी दोनों भाषाओं की विभिन्न साहित्यिक विधाओं के सशक्त हस्ताक्षर हैं। आज साप्ताहिक स्तम्भ –अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती शृंखला की अगली कड़ी में प्रस्तुत है एक अत्यंत भावप्रवण कविता “पाखरे चिंतेत आता”।)
☆ साप्ताहिक स्तम्भ – अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 49 ☆
☆ पाखरे चिंतेत आता ☆
वादळाशी झाड भिडते रडत नाही
मुळ इतके घट्ट आहे सुटत नाही
पाय, तळवे, लोह झाले पूर्ण आता
पावलांना फार काटे रुतत नाही
हिरवळीचा बेगडी आहे दिखावा
पावलांना सुखवणारे गवत नाही
फूल बाजारात मिळते दाम देता
गंध-वारा विकत येथे मिळत नाही
शांततेचा मंत्र लोका का कळेना ?
मज कळाला मी कुणावर चिडत नाही
शेत विकले पाखरे चिंतेत आता
माॕल झाले पोट त्याचे भरत नाही
लालसा ही भावनेच्या अग्र भागी
प्रीतिची ही बाग आता फुलत नाही
© अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८