सुश्री प्रभा सोनवणे
(आज प्रस्तुत है सुश्री प्रभा सोनवणे जी के साप्ताहिक स्तम्भ “कवितेच्या प्रदेशात” में उनके ही गांव पर आधारित एक अतिसुन्दर कविता कविता गावाकडची कविता…..। सुश्री प्रभा जी की यह रचना उनके गांव का सजीव चित्रण है। काश हमारे सभी गांव इसी तरह हरित एवं श्वेत क्रांति के प्रतीक होते तो हमारा देश कितना सुन्दर देश होता ? सुश्री प्रभा जी द्वारा रचित इस भावप्रवण रचना के लिए उनकी लेखनी को सादर नमन।
मुझे पूर्ण विश्वास है कि आप निश्चित ही प्रत्येक बुधवार सुश्री प्रभा जी की रचना की प्रतीक्षा करते होंगे. आप प्रत्येक बुधवार को सुश्री प्रभा जी के उत्कृष्ट साहित्य को साप्ताहिक स्तम्भ – “कवितेच्या प्रदेशात” पढ़ सकते हैं।)
☆ साप्ताहिक स्तम्भ – कवितेच्या प्रदेशात # 58 ☆
☆ गावाकडची कविता….. ☆
(राहू हे आमचं गाव. दौंड तालुक्यातील….)
नदीकाठावर वसले आहे आमचे राहू
मिडीयाला ही दिसले आहे आमचे राहू
असे थोरांचे अन मोरांचे कोण कोणाचे
दलदली मध्ये फसले आहे आमचे राहू
महादेवाचे,शिवशंभोचे ,गाव ऊसाचे
हरितक्रांतीने हसले आहे आमचे राहू
धवलक्रांती ही घडते,हे तर क्षेत्र दूधाचे
मनी लोकांच्या ठसले आहे आमचे राहू
इथे रानातच सळसळ चाले सर्प-नागांची
कुठे कोणाला डसले आहे आमचे राहू
‘प्रभा ‘त्याच्या ही स्वप्नी सजते पीक सोन्याचे
बळीराजाने कसले आहे आमचे राहू
© प्रभा सोनवणे
“सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011
मोबाईल-९२७०७२९५०३, email- [email protected]
धन्यवाद हेमंतजी, सुंदर प्रस्तावना!
अर्थपूर्ण रचना