श्री शेखर किसनराव पालखे
( मराठी साहित्यकार श्री शेखर किसनराव पालखे जी लगातार स्वान्तः सुखाय सकारात्मक साहित्य की रचना कर रहे हैं । आपकी रचनाएँ ह्रदय की गहराइयों से लेखनी के माध्यम से कागज़ पर उतरती प्रतीत होती हैं। हमारे प्रबुद्ध पाठकों का उन्हें प्रतिसाद अवश्य मिलेगा इस अपेक्षा के साथ हम आपकी रचनाओं को हमारे प्रबुद्ध पाठकों तक आपके साप्ताहिक स्तम्भ – शेखर साहित्य शीर्षक से प्रत्येक शुक्रवार पहुँचाने का प्रयास करेंगे । आज प्रस्तुत है आपकी भावप्रवण कविता “अस्तित्वभान!!!”)
☆ साप्ताहिक स्तम्भ – शेखर साहित्य # 2 ☆
☆ कविता – अस्तित्वभान!!! ☆
प्रत्येक गजबजलेल्या घराघरांत
नांदते आहे एक रिकामंपण
समुद्राची गंभीर गाज
ऐकू येते आहे घरापर्यंत
माणसांच्या गर्दीतसुद्धा
माणूसपण हरवत चालले आहे
संवादातील लय बिघडून
जिवंतपण संपते आहे
अंधाराला येते आहे का
प्रकाशाची गती?…
कुंठित होऊ घातली आहे
मानवजातीची मती…
अजून किती दिवस मी -माझं -मला?…
हा तुझा गाव नाही
याचं भान येऊदे तुला…
घरातील पाहुण्यासारखा
चार दिवस छान रहा
शुद्ध मनानं सर्व सोपवून
मोक्षासाठी तयार व्हा .
© शेखर किसनराव पालखे
पुणे
15-04-20
खरच,वास्तवाचे भान आणणारी कविता
धन्यवाद!!!