सुश्री प्रभा सोनवणे

(आज प्रस्तुत है सुश्री प्रभा सोनवणे जी के साप्ताहिक स्तम्भ  “कवितेच्या प्रदेशात” में  स्त्री विमर्श पर एक अतिसुन्दर काव्यात्मक अभिव्यक्ति  सुपर माॅम। आज माँ के कार्यों का  दायरा एवं दायित्व समय के साथ बढ़ गया है जिसकी सुश्री प्रभा जी ने अत्यंत सुन्दर विवेचना की है। मुझे पूर्ण विश्वास है  कि आप निश्चित ही प्रत्येक बुधवार सुश्री प्रभा जी की रचना की प्रतीक्षा करते होंगे. आप  प्रत्येक बुधवार को सुश्री प्रभा जी  के उत्कृष्ट साहित्य को  साप्ताहिक स्तम्भ  – “कवितेच्या प्रदेशात” पढ़ सकते  हैं।)

☆ साप्ताहिक स्तम्भ – कवितेच्या प्रदेशात # 61 ☆

☆ सुपर माॅम ☆

ती नसते तळ्यात मळ्यात,

ती डायरेक्ट खळ्यात…..

 

करून घेते सारी कामं फटाफट….

तिला आवडत नाही कुठलीच पळवाट….

 

सहा वाजता उठून ती जाॅगिंग करते…

सात च्या ठोक्याला स्वयंपाकीणबाई बेल वाजवते…

ती देते सूचना….चहा नाश्त्याच्या…

 

ती मुलीला हाक मारते..पाठवते

अंघोळीला…

तोवर दुसरी कामवाली आलेली असते…

 

ती करते मुलीची वेणीफणी…

 

दुस-या कामवाली ला सांगते दिवसभराची कामं…निवडणं, टिपणं…डस्टिंग…धुणी भांडी…मुलीला शाळेतून आणणं…तिचं खाणं पिणं, खेळायला पाठवणं…सारं आजीच्या देखरेखीखाली  !

तिसरी कामवाली उरलेली कामं करायला !

 

घरात सासू सास-यांना ही वागवते

सन्मानाने !

नातीला ही लळा असतो आजी आजोबांचा !

 

नव-याचा, मुलीचा आणि स्वतःचा

डबा भरून,ती बाहेर पडते….

आपली कार सफाईदारपणे बाहेर काढते…

 

मुलीला स्कूलबस मध्ये बसवून “तो” त्याच्या कार ने ऑफिस कडे रवाना…

 

त्यांनी समंजस पणे वाटून घेतलेली असतात कामे…

 

दोघं ही करिअर माईंडेड…

आपापल्या क्षेत्रात यशस्वी,कर्तृत्ववान वगैरे….

आणि कुटुंब वत्सल ही…

 

तीन तीन कामवाल्यांना सांभाळतात…सढळ हाताने पगार देऊन!

 

ती मुलीचं होमवर्क करून घेते स्वतः…तिचं नृत्य…खेळ…चित्र…वाचन..

सा-याकडे लक्ष देते जातीने!

 

रविवारी ती अगदी घरासाठी असते…

तिच्याकडे वेळच नसतो सहा दिवस….

हा एक दिवस ती बायको, आई, सून बनून राखते घराचं घरपण…

ती खरंच एक सुपर वुमन….

 

नव-याच्या खांद्याला खांदा लावून हार्डवर्क करणारी…निष्णात…नामवंत!

 

मुलगी म्हणते तिला आई…आणि बाबा विषयी ही बाळगते आपार प्रेम आणि आदर…..

 

कुठलंही अवडंबर न करता ती

जपते आपला धर्म..संस्कृती…

साजरे करते सणवार….

 

नव-याला साथ देणारी ती असते अर्धांगिनी….दक्ष आई आणि काळजी घेणारी सून  !

 

घर आणि ऑफिस चा समतोल साधणारी सुपर माॅम……

ती कधीच नसते तळ्यात मळ्यात,

डायरेक्ट खळ्यात  !!!

 

© प्रभा सोनवणे

“सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

2 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
सुहास रघुनाथ पंडित सांगली

सुपर माॅम चे अचूक वर्णन.

Prabha Sonawane

धन्यवाद सुहासजी!