सुजित शिवाजी कदम
☆ साप्ताहिक स्तंभ – सुजित साहित्य #54 ☆
☆ काय हवय…? ☆
त्या दिवशी मंदीरातून
देवाच दर्शन घेऊन मी बाहेर पडलो
तेवढ्यात…
मळकटलेल्या कपड्यांबरोबर
लेकराचा मळकटलेला हात
समोर आला…!
मी म्हंटलं काय हवंय..?
त्यांनं…
पसरलेला हात मागे घेतला आणि
क्षणात उत्तर दिलं … आई…!
मी काहीच न बोलता
खिशातलं नाणं त्याच्या मळकटलेल्या
हातावर ठेऊन निघून आलो…
पण.. तो मात्र
वाट पहात बसला असेल…
मळकटलेला हात पसरल्यावर
त्यानं असंख्य जणांना दिलेल्या
उत्तराच्या उत्तराची…!
© सुजित शिवाजी कदम
पुणे, महाराष्ट्र
मो.७२७६२८२६२६
दिनांक 27/3/2019
सुजित, खुपच छान भावना असतात तुझ्या कवितेत!!!
अनुत्तरीत करणारी कविता