श्री अशोक श्रीपाद भांबुरे
(वरिष्ठ मराठी साहित्यकार श्री अशोक श्रीपाद भांबुरे जी का अपना एक काव्य संसार है । आप मराठी एवं हिन्दी दोनों भाषाओं की विभिन्न साहित्यिक विधाओं के सशक्त हस्ताक्षर हैं। आज साप्ताहिक स्तम्भ –अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती शृंखला की अगली कड़ी में प्रस्तुत है एक समसामयिक एवं भावप्रवण कविता “सुगंधाचा तोरा”।)
☆ साप्ताहिक स्तम्भ – अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 64 ☆
☆ सुगंधाचा तोरा ☆
साऱ्या फुलात वेगळी
छान भासते ही कळी
दुमड ही पाकळीची
जशी गालावर खळी
तिच्या सुगंधाचा तोरा
होता भाळलेला वारा
दोष फक्त त्याचा नाही
तीही पडेते ना गळी
कधी वेणी कधी हार
फूल दोरा झाले यार
जीव जीवात गुंतता
हळू उमलते कळी
पाकळीचे हे पदर
जसे मोकळे अधर
माशा घोंगावत आल्या
डंख दिला होता भाळी
आली वादळी वरात
होती कळी ही भरात
सुन्या सुन्या या बागेचा
हिरमुसलेला माळी
© अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈