श्री शेखर किसनराव पालखे
☆ साप्ताहिक स्तम्भ – शेखर साहित्य # 12 ☆
☆ नित्य तू जवळी रहा ………. ☆
सोबतीला तू हवा, दुसरे काही नको
नित्य तू जवळी रहा, मागणे दुजे नको !
याच त्या सुखी क्षणांचा, लागला खे आहे लळा
दिसणे तुझे, असणे तुझे, आणखी काही नको !
लिहून मी ठेविलें, माझ्याच या भाळी तुला
पर्व हे सुरु जाहलें, वाढो त्याची कळा !
सात्त्विकता ही तुझी, आणखी देशील का
रंगले मी तुझ्यात, तू ही माझ्यात रंगशील का?
गगनाहुनी ऊंच हा आनंद माझा वेगळा,
सात्त्विकच्या रूपाने आयुष्य येई फळा !
© शेखर किसनराव पालखे
पुणे
17/05/20
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈